शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

नीरा-कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:02 IST

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. पाण्याच्या ...

दशरथ ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. पाण्याच्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील कृष्णा व नीरा खोºयातील धरणाचा पाणीसाठा तीस टक्क्यांच्या खाली आल्याने स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीवापराचे योग्य नियोजन करणे गरजेचे बनले आहे.नीरा व कृष्णा खोºयातील धरणांच्या पाणीसाठ्याचा मागील चार महिन्यांत अनिर्बंध उपसा झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या मध्यावरच पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. गेल्या नीरा खोºयातील नीरा देवधर, भाटघर व वीर या तिन्ही धरणांतील पाणीसाठा साठ टक्क्यांपेक्षा जास्त होता. या तुलनेत यावर्षी नीरा खोºयातील नीरा देवधर १३ .८१ टक्के, भाटघर १९.१७ टक्के व वीर धरणात केवळ ५०.०६ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. तर कृष्णा खोºयातील कोयना धरणात ४५.०१ टक्के, धोम १४.७४ टक्के, कण्हेर ३४.७२ टक्के, धोम-बलकवडी २०.९२ टक्के, उरमोडी २५.२२ टक्के तर तारळी धरणात ४६.३७ टक्के एवढेच पाणी शिल्लक आहे.यावर्षी तापमान ४० अंशांच्या जवळपास आहे. पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यावर्षी टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे तसेच सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत-जास्त वापर करून पाणी काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर अनधिकृत पाणी उपसा न करता सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.बळीराजा हवालदिलनीरा खोºयातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो. येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांत यावर्षी सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पावसाअभावी यंदा शेतीचा हंगामही अत्यल्प उत्पादनाचा झाला आहे. उन्हामुळे पाण्याची गंभीर स्थिती यावर्षी दिसू लागल्याने बळीराजा हवालदिल झालेला पाहावयास मिळत आहे.