वाई बाजार समितीत उच्चांकी दराने हळदी विक्रीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 07:12 PM2020-02-20T19:12:49+5:302020-02-20T19:14:40+5:30

मार्केट यार्ड आवाराबाहेर शेतकऱ्यांची वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाराबाहेर मालाची विक्री करू नये. नवीन हळदीची विक्री करताना ग्रेडिंग करून मार्केटवर त्यांची विक्री करावी. सर्व आडत व्यापा-यांनी नियमितपणे लिलाव काढावा व शेतक-यांना पेमेंट द्यावे,’ अशा सूचनाही दिल्या

Start selling slowly at higher rates | वाई बाजार समितीत उच्चांकी दराने हळदी विक्रीला प्रारंभ

वाई बाजार समितीत नवीन हळद मालाच्या लिलावास नितीन पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी सभापती लक्ष्मण पिसाळ, उपसभापती दीपक बाबर, शिवाजीराव पिसाळ, शशिकांत पवार, दत्तात्रय जमदाडे, हिराशेठ जैन, कांतीलाल भुरमल उपस्थित होते.

Next

वाई : वाई बाजार समितीत १२८३ पोती नवीन हळदीची आवक झाली. जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते नवीन हळदीच्या लिलावाचा प्रारंभ झाला. उत्तम पिसाळ यांच्या हळदीला प्रति क्विंटल १० हजार १११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. हळदीचा दर प्रति क्विंटल ७ हजार ५०० ते १० हजार ११२ रुपये निघाला.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पिसाळ म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी आपला हळद माल निवडून स्वच्छ करून, वाळवून मार्केट यार्डवर लिलावासाठी आणावा.

मार्केट यार्ड आवाराबाहेर शेतकऱ्यांची वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाराबाहेर मालाची विक्री करू नये. नवीन हळदीची विक्री करताना ग्रेडिंग करून मार्केटवर त्यांची विक्री करावी. सर्व आडत व्यापा-यांनी नियमितपणे लिलाव काढावा व शेतक-यांना पेमेंट द्यावे,’ अशा सूचनाही दिल्या.

यावेळी प्रमोद शिंदे, व्यापारी हिराशेठ जैन, रवी कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसभापती दीपक बाबर यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार मांढरे यांनी स्वागत केले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव पिसाळ, अ‍ॅड. उदयसिंह पिसाळ, दिलीप पिसाळ, शशिकांत पवार, कांतीलाल पवार, मोहन जाधव, संचालक विक्रमसिंह पिसाळ, विजयकुमार मांढरे, कुमार जगताप, राजेंद्र सोनावणे, दत्तात्रय जमदाडे, हारुणभाई बागवान, गणेश बनसोडे, शारदा गायकवाड, बबई लोळे, नामदेव हिरवे, व्यापारी मोहन ओसवाल, कांतीलाल ओसवाल, मिठालाल जैन, कांतीलाल भुरमल, शंकरलाल ओसवाल, मदनलाल ओसवाल, प्रवीण ओसवाल, कन्हैया गांधी, विनोद पावशे, शंकर जाधव, सचिन जेधे, बाळासाहेब आचफळे, प्रभारी सचिव राजेंद्र कदम, शेतकरी, हमाल, खरेदीदार, कर्मचारी उपस्थित होते.


तालुक्यात नऊशे हेक्टरवर उत्पादन
वाई तालुक्यात नऊशे हेक्टर हळदीचे क्षेत्र आहे. ओल्या हळदीचे उत्पादन सोळा ते अठरा टन उत्पादन असून, वळून चार ते पाच टन उत्पादन होते. वाई बाजार समितीमध्ये वाई तालुक्यासह जावळी, खंडाळा व कोरेगाव तालुक्यातून हळद विक्रीसाठी येत असते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी दिली.

 

 

Web Title: Start selling slowly at higher rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.