शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना, धोम जलाशयांत ॲम्फिबायस प्लेनचा उपक्रम सुरू करा, उदयनराजे भोसले यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:30 IST

केंद्राने नुकतेच 'या' राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला

सातारा : कोयना शिवसागर आणि धोम धरण जलाशयांमध्ये जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उड्डाण घेणारी सी प्लेनची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.याबाबत मंत्री मोहोळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सातारा जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. प्रचंड पर्जन्यमान आणि दुष्काळी भाग अशा विरोधीभासी वातावरणातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण हे तालुके दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखले जातात. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन थंड हवेची ठिकाणे लाखो भारतीय आणि परदेशी पर्यटकांना साद घालत असतात.सातारा लोकसभा मतदारसंघातील या वैशिष्ट्यांमुळे येथे विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे. महाराष्ट् शासनाने जावली तालुक्यातील मुनावळे या गावात जलक्रीडा पर्यटन विकास साध्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच शिवसागर जलाशयामध्ये जागतिक स्तरावरील जलपर्यटनाची योजनाही मंजूर केली असून, त्याचीही कार्यवाही लवकरच सुरू होत आहे.या जलपर्यटन विकासाच्या जोडीला, सुमारे ९०० चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण शिवसागर जलाशयात आणि सुमारे २० चौरस किलोमीटरच्या धोम जलाशयात उड्डाण घेणारा किंवा पाण्यावर उतरणारा ‘सी प्लेन’ उपक्रम सुरू करण्याबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाने योजना राबवावी. ॲम्फिबायस प्लेन्सचा उपक्रम राबविल्यास, या ठिकाणी आपोआप नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.केंद्राने नुकतेच मेघालय आणि आसाम राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर कोयना-शिवसागर आणि धोम जलाशयांत हा उपक्रम सुरू करावा. यावेळी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, करण यादव, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेmurlidhar moholमुरलीधर मोहोळ