शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या संपानं प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 18:08 IST

सातारा , दि. १७ :  ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संपात सुमारे साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सणानिमित्ताने गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे वडाप चालकांची मात्र दिवाळी झाली.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग मिळावा, ...

ठळक मुद्देवडाप तेजीत, खासगी वाहतूकदारांची दिवाळीसातारा जिल्ह्यातून साडेचार हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी चालक, वाहक, कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचार्यांबरोबर लिपिकही सहभागी

सातारा , दि. १७ :  ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संपात सुमारे साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सणानिमित्ताने गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे वडाप चालकांची मात्र दिवाळी झाली.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने मंगळवारी पहाटेपासून ऐन दिवाळीत बेमुदत संप सुरू केला आहे.

मान्यताप्राप्त कामगार संघटनने सुरू केलेल्या आंदोलनात एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. चालक, वाहक, कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचार्यांबरोबर लिपिकही सहभागी झाले आहेत.

ऐनवेळी फूट पडलीच तरी आंदोलन विस्कटू नये म्हणून काही कर्मचार्यांनी सातारा बसस्थानकातील एसटीच्या चाकातील हवा सोडून दिली आहे. तसेच इतर गाड्या बाहेर निघणार नाही, अशा प्रकारे गाड्या आडव्या लावल्या आहेत. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.खासगी वाहतूकदारांची दिवाळीआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी एसटी बसस्थानकाकडे फिरकलेच नाहीत. महामार्गावरच ते थांबलेले असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस, वडापकडे हे प्रवासी वळू लागले आहेत

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ