शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

सातारा : एसटी चालकाला बेदम मारहाण, दोन दात पडले; मोबाईलचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:02 IST

शिरवळ येथे एसटी चालकाला बेदम मारहाण करीत मोबाईलचे नुकसान करण्यात आले. यामुळे सरकारी कामात अडथळा व मारहाणप्रकरणी कारचालकासह दोघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देएसटी चालकाला बेदम मारहाण, दोन दात पडले; मोबाईलचेही नुकसान शासकीय कामात अडथळाप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा

शिरवळ : शिरवळ येथे एसटी चालकाला बेदम मारहाण करीत मोबाईलचे नुकसान करण्यात आले. यामुळे सरकारी कामात अडथळा व मारहाणप्रकरणी कारचालकासह दोघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई आगाराची एसटी (एमएच ११ टी ९२७७) ही बस चालक बाबालाल शहाबुद्दीन शेख (वय ४०, रा. सोळशी ता. कोरेगाव) हे स्वारगेटहून सातारा याठिकाणी घेऊन निघाले होते. यावेळी सोबत वाहक जयश्री रामचंद्र महामुनी ह्या सोबत होत्या.

संबंधित बस शिरवळ हद्दीत आली असता पाठीमागून आलेल्या कार (एमएच ११ सीक्यू ०६२१) ने एसटीला ओव्हरटेक करीत एस.टी. बससमोर येऊन अचानक थांबली. यावेळी बससमोर अचानकपणे बससमोर कार थांबल्याने चालक बाबालाल शेख यांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला असता बस कारला जाऊन चिकटली.यावेळी कारमधील कारचालक व आणखी एक जण कारमधून उतरत बसचालक बाबालाल शेख यांना बसमधून खाली उतरवत कारचालकाने बाबालाल शेख यांच्या तोंडावर डोक्याने मारहाण केली. शेख यांना रस्त्यावर आडवे पाडत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी मारहाण केल्याने बाबालाल शेख यांचे दात पडले. यावेळी कारचालकासह दोघेजण कार घेऊन सातारा बाजूकडे निघून गेले.दरम्यान, एसटी बसचालक बाबालाल शेख यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कारमधील कारचालकासह दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर