शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आनेवाडी टोलनाक्यावर एसटीने घेतला पेट, चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

By जगदीश कोष्टी | Updated: June 12, 2023 13:11 IST

दुर्घटनाग्रस्त एसटीतील प्रवाशांना पर्यायी एसटीने पुण्याकडे मार्गस्थ

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगाराच्या एसटीने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर चालक, वाहकाने तत्काळ प्रसंगावधानता दाखवत सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र एसटीचे मोठे नुकसान झाले. ही घटना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी साडेअकराच्या समारास घडली. यावेळी गाडीतून २७ प्रवासी प्रवास करत होते.

याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगाराची राधानगरी-स्वारगेट ही गाडी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आली. तेथे वाहतूक नियंत्रण कक्षेत नोंद करुन नवीन प्रवाशांना घेऊन ती गाडी पुढे मार्गस्थ झाली. साधारणत: तेरा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात आले.त्यानंतर गाडी महामार्गाच्या बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना साहित्यांसह खाली उतरवण्यात आले.काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. जागीच्या ज्वाला उग्ररुप धारण करत होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव धाव घेतली. किसन वीर साखर कारखान्याच्या अग्नीशमन बंबाने काही वेळा आग नियंत्रणात आणली.

पर्यायी गाडीने प्रवासी मार्गस्थघटनेची माहिती समजल्यानंतर वाई आगार तसेच सातारा विभागीय कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुर्घटनाग्रस्त एसटीतील प्रवाशांना पर्यायी एसटीने पुण्याकडे मार्गस्थ केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग