शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पसरलेल्या लोकवस्तीचे ‘पसरणी’ गाव

By admin | Updated: March 24, 2015 00:19 IST

ऐतिहासिक परंपरा : गावकरी जपतायत धार्मिक सलोखा--नावामागची कहाणी-पंधरा

संजीव वरे - वाई  सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत अनेक छोटी-छोटी गावं वसली आहेत. पूर्वी डोंगररांगांच्या पायथ्याला असलेल्या जंगलात मोकळ्या जागेत शेती करून लोक शेताजवळ वस्ती करून राहू लागले. जागा मिळेल तिथे चार-दोन घरांची वस्ती निर्माण झाली. पसरून पसरून असणाऱ्या लोकवस्तीमुळं ‘पसरणी’ गावाची निर्मिती झाली. लोकवस्तीच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात गायरानं होती. गुराखी गुरं चरायला नेत. दगडी बारवातलं पाणी पिऊन जनावरं वनराईत विश्रांतीसाठी पसरत. यावरूनही लोकवस्तीला ‘पसरणी’ नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते.  शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर. वाईहून पांचगणी-महाबळेश्वरला जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगेत नागमोडी वळणाच्या घाटाला ‘पसरणी घाट’ असे नाव आहे. डोंगराच्या पायथ्याला व कृष्णा नदीच्या तीरावर येथील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात वस्ती करून राहिल्याने व ही वस्ती पसरून असल्याने गावचे नाव पसरणी पडले आहे. हे गाव शाहू महाराजांनी सातारचा किल्लेदार शेखमिरा याला इनाम दिले होते. पूर्वी येथे ‘नवाबवाडा’ प्रसिद्ध होता. या वाड्यात त्याकाळी हत्ती झुलायचे. ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात.येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृष्णा नदीचे पात्र दक्षिणेकडे वाहते. गावात जुन्या काळातील बारव आहे. या गावी शाहीर साबळे, क्रांतिवीर नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, सेनापती बापट यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दसऱ्याला भैरवनाथाची पालखी निघते. यावेळी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी असे साहसी खेळ खेळले जातात. कीर्तिवंतांचं गावपसरणी गावात महराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के, बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ गजानन दाहोत्रे, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी जन्माला आले. त्यांनी गावची कीर्ती सर्वदूर पोहोचविली आहे. शाहीर साबळे, बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ‘पद्मश्रीं’चे गाव म्हणूनही पसरणीची ओळख निर्माण झाली आहे.पसरणीच्या चामडी बुटांची ब्रिटिशांना भुरळपसरणीची रेशमी ‘साळवी लुगडी’ प्रसिद्ध होती. इंग्रज राजवटीत गव्हर्नर साहेबांना येथील चर्मकारांनी बनविलेल्या बुटांनी भुरळ पाडलेली. म्हणून ते येथील चामडी बूट इंग्लंडला घेऊन जायचे. आजही महाबळेश्वरमध्ये काही चर्मकार बांधव कातडी चपला, बूट बनविण्याचा व्यवसाय करतात.