जलनेती शुद्धीक्रिया प्रशिक्षण उत्सहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST2021-07-18T04:27:35+5:302021-07-18T04:27:35+5:30

रामापूर : कोरोना महामारीच्या काळात स्वत:चे आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य अभ्यास अत्यंत महत्त्वाचे आहे. योग विद्या ...

In the spirit of water purification training | जलनेती शुद्धीक्रिया प्रशिक्षण उत्सहात

जलनेती शुद्धीक्रिया प्रशिक्षण उत्सहात

रामापूर : कोरोना महामारीच्या काळात स्वत:चे आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य अभ्यास अत्यंत महत्त्वाचे आहे. योग विद्या धाम सातारा व कमलेश्‍वरी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्था पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत जलनेती शुद्धी क्रिया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कमलेश्‍वरी संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव जगताप, योग साधक सुशांत शिंदे, प्राचार्य नितेश नाडे, उपस्थित होते. यावेळी योग साधक सुशांत शिंदे यांनी जलनेती शुद्धी क्रिया प्रशिक्षणामध्ये योग अभ्यासाबद्दल माहिती दिली. त्याच्या अनुषंगाने जलनेती शुद्धी क्रिया प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच शिंदे यांनी जलनेती शुद्धी क्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखवले शाळेतील शिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

Web Title: In the spirit of water purification training