शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

कऱ्हाड तालुक्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवर पेरण्या रखडल्या!, शेतकरी चिंतेत

By संजय पाटील | Updated: July 1, 2023 17:36 IST

कृषी विभागानेही शेतकऱ्यांना पेरा वाया जाऊ नये, यासाठी थांबण्याचा सल्ला दिला आहे

संजय पाटीलकऱ्हाड : मृग नक्षत्रावर पेरणी करून शेतकरी पूर्वी निर्धास्त व्हायचे; पण सध्या ऋतुमान बदलल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजनही कोलमडले आहे. आषाढ निम्म्यावर आला तरी शेतात कुऱ्या मिरवलेल्या नाहीत. कऱ्हाड तालुक्यात आतापर्यंत केवळ दोन टक्के क्षेत्रातच पेरणी झाली असून ३७ हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत.मान्सूनने हजेरी लावली. आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी व्यापले. वातावरणात बदलही झाला; पण गत आठ दिवसांपासून एखाद्या हलक्या सरीशिवाय दमदार पाऊसच झालेला नाही. पेरणी व टोकणीसाठी शेतात ओलाव्याची गरज असते. मात्र, ओलावा होईल असा पाऊसच तालुक्यात झालेला नाही. चार बोटांखाली जमीन अद्यापही कोरडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकणी, पेरणीची कामे हाती घेतलेली नाहीत. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना पेरा वाया जाऊ नये, यासाठी थांबण्याचा सल्ला दिला आहे. ८० ते ९० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्यांची गडबड करू नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार ४७२ हेक्टर नोंदले गेले आहे. त्यापैकी केवळ १ हजार ३४ हेक्टर म्हणजेच केवळ २ टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झाली आहे. अद्यापही ९८ टक्के क्षेत्र पेरणीविना पडून आहे.

मंडलनिहाय अपेक्षित पेरणीक्षेत्र७७९४ : कऱ्हाड९१६३ : सैदापूर९९५१ : उंब्रज११,६६९ : उंडाळे

पीकनिहाय नोंदले गेलेले क्षेत्रसोयाबीन : १७५८४भात : ५४२६भुईमूग : १०२०४मका : ६८५तूर : २०उडीद : ५०मूग : ३०सूर्यफूल : १०

अपेक्षित पेरणी२७०३७ : गळीत धान्य१०५५८ : तृणधान्य९८२ : कडधान्य(सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • ३७५४३ : हेक्टरवरील पेरण्या रखडल्या
  • १०३४ : हेक्टरवरील पेरण्या पूर्ण

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये. पेरणीसाठी ८० ते ९० मिलिमीटर एवढ्या पावसाची आवश्यकता असते. - डी. ए. खरात, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी