शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

स्वरालीचा स्वर टाकीतच घुसमटला !

By admin | Updated: February 10, 2017 22:36 IST

‘ती’च्या जाण्यानं जिल्हा हळहळला : गावोगावी शोधलं; पण ती घरामागंच सापडली; तीन दिवसांचं सर्च आॅपरेशन क्षणात थांबलं

कऱ्हाड : ‘मुलं ही देवाघरची फुलं,’ असं म्हणतात. पण अशाच एका फुलाचा श्वास बुधवारी टाकीत गुदमरला. जिच्या शोधासाठी सलग तीन दिवस पोलिसांनी जिल्हा पालथा घातला तीच स्वराली तिच्याच घराच्या पाठीमागील ड्रेनेजमध्ये मृतावस्थेत सापडली. तीन दिवसांच आशादायी ‘सर्च आॅपरेशन’ शुक्रवारी दुपारी अखेर दुर्दैवानं थांबवावं लागलं. आणि सारा जिल्हा अंत:करणातून हळहळला.विद्यानगर-सैदापूर येथील ‘ज्ञानगंगा अपार्टमेंट’मध्ये वास्तव्यास असणाऱ्या पाटील कुटुंबीयांसाठी बुधवारचा दिवस काळ बनून आला. डॉ. वैभव पाटील यांची चार वर्षांची स्वराली ही चिमुरडी अपार्टमेंटखालून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. डॉ. वैभव यांच्यासह इतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी कॉलेजपर्यंत स्वरालीला शोधले. मात्र, ती सापडली नाही. दोन महिलांसोबत स्वरालीला पाहिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर अपहरणाची शक्यता बळावली. आणि पाटील कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठलं. अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करून पोलिसांनीही स्वरालीचा शोध सुरू केला. सायंकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान अपार्टमेंट परिसरातच घुटमळले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत परिसरातील शिवार पिंजून काढण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, परिविक्षाधिन पोलिस उपअधिक्षक शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली. या ‘सर्च आॅपरेशन’मध्ये सोशल मीडियाही सक्रिय झाला. स्वरालीचा फोटो व इतर माहिती ‘व्हायरल’ झाली. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून स्वरालीला पाहिल्याची माहिती ठिकठिकाणाहून समोर येऊ लागली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेची दोन, पाटण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पांचाळ यांची दोन, ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांचे एक, उंब्रज पोलिसांचे एक, सातारा शहर पोलिसांचे एक अशी दहा पोलिस पथके या तपासात उतरली. पाटणमधील ज्या महिलेने स्वरालीला अन्य दोन महिलांसमवेत पाहिले होते त्या महिलेकडे चौकशी करण्यात आली. तसेच सातारा येथील राजवाडा परिसरातही स्वरालीला पाहिल्याची चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी तो परिसर पिंजून काढला. विटा येथेही एक पथक खात्रीसाठी पोहोचले. ढेबेवाडी भागातही स्वरालीला पाहिल्याची चर्चा झाल्याने पथक नाईकबापर्यंत पोहोचले. मात्र, या तपास पथकांच्या हाती काहीही लागले नाही. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातून बेपत्ता स्वरालीच्या शोधासाठी हालचाली सुरू होत्या. सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल झाल्यामुळे स्वरालीच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली होती. शुक्रवारी दुपारी मात्र ही शोधमोहीम दुर्दैवानं थांबवावी लागली. जिचा शोध जिल्हाभर घेतला गेला, ती स्वराली तिच्याच घराच्या पाठीमागील बाजूस ड्रेनेजमध्ये मृतावस्थेत आढळली. स्वरालीचा हा दुर्दैवी मृत्यू जसा तिच्या कुटुंबासाठी धक्कादायक होता तसाच तो पोलिस आणि जिल्हावासीयांसाठीही काळीज पिळवटणारा होता. ‘ती’ तिथं का गेली?ज्ञानगंगा अपार्टमेंट विस्तीर्ण आहे. या अपार्टमेंटच्या सभोवती संरक्षक जाळीचे कुंपण असून, पाठीमागील बाजूस आणखी एक अपार्टमेंट आहे. स्वराली समोरील बाजूस वाळूत खेळताना अनेकांना दिसली होती. मात्र, ती अपार्टमेंटच्या मागे कधी गेली, हे कोणालाच समजले नाही. दोन मुलींसोबत स्वरालीला खेळताना एका आजींनी पाहिले होते तर स्वरालीला हातात लहानशी काठी घेऊन फुलपाखरांच्या मागे धावताना पाहिल्याचे एका नजीकच्या नागरिकाने पोलिसांना सांगितले. दोन विहिरी, एक खड्डा तपासला; पण...ज्ञानगंगा अपार्टमेंटच्या डाव्या बाजूस उसाचे शिवार आहे. तसेच अपार्टमेंटच्या पूर्वेला एक व पश्चिमेला एक अशा दोन विहिरी आहेत. अपार्टमेंटपासून काही अंतरावर एक खड्डाही आहे. दुर्घटना व घातपाताच्या शक्यतेने पोलिसांनी गुरुवारीच संबंधित उसाचे शिवार पिंजून काढले. तसेच दोन्ही विहिरी व खड्ड्यात उतरूनही शोध घेण्यात आला होता. दोन खेळणी स्वरालीची नव्हती?ज्ञानगंगा अपार्टमेंटच्या पाठीमागील बाजूस पोलिसांना दोन लहान खेळणी आढळून आली. त्या खेळण्यांवर धूळ साचली होती. ती खेळणी स्वरालीची असावीत, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याबाबत त्यांनी नातेवाइकांकडे चौकशीही केली. मात्र, स्वरालीकडे अशी खेळणी नव्हती, असे नातेवाइकांनी सांगितले आहे.‘व्हिसेरा’ राखून ठेवला !स्वरालीचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनीही पोलिसांना तसेच सांगितले आहे. मात्र, सर्व शक्यता गृहित धरून अद्यापही पोलिस चौकशी करीत आहेत. त्यासाठी पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, तो पुढील तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. शेजारच्या प्रत्येक घराची झडतीबुधवारी रात्री पोलिसांसह परिसरातील युवकांनी शोधमोहीम राबविली. यावेळी परिसरातील प्रत्येक घराची झडती घेण्यात आली. तसेच आसपासची दुकाने, हॉटेल, ढाबा अशा प्रत्येक ठिकाणी शोध घेण्यात आला होता. ज्ञानगंगा अपार्टमेंटसह नजीकच राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली होती. स्वरालीला कधी, कुठे, कुणी आणि कुणासोबत पाहिलं, याची माहिती घेण्यासाठी पोलिस हरतऱ्हेने प्रयत्न करीत होते.