शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कुणाचं भाग्य फळफळलं.. तर कुणाचं नशीब फुटलं!

By admin | Updated: September 26, 2014 23:32 IST

लगाव बत्ती

‘नशीब बदलायला वेळ नाही लागत!’ असं कधीतरी कुठं तरी जाहिरातीत आम्ही पामरांनी वाचलेलं; पण एकाच वेळी ‘कुणाचं भाग्य फळफळलं’ तर ‘कुणाचं नशीब फुटलं’ अशा विरोधभासाच्या घटना पाहण्याचा योग मात्र सातारकरांनी अनुभवलेला. काय सांगू रावऽऽ कालपर्यंत जिथं साधं चिटपाखरूही फिरकत नव्हतं, तिथं आज अकस्मातपणे दहा हजारांची ‘लड’ उडाली... अन् जिथं गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड धामधूम सुरू होती, तिथं क्षणाधार्थ सामसूम निर्माण झाली. ‘महायुती’ अन् ‘आघाडी’च्या आकस्मिक घटस्फोटानंतर अनेक इच्छुक म्हणे, अनाथ झाले... तर अनेकांना राजकीयदृष्ट्या आधार मिळाला.साताऱ्यात ‘बाबाराजें’च्या विरोधात ‘दीपक पवार’ की ‘रवी पवार’ असा प्रश्न चर्चेत असताना आज अचानक ‘रजनी पवार’ नाव पुढं आलं. आता याला कारणीभूत अजित पवार आहेत, हा भाग वेगळा; कारण ‘स्वतंत्र लढलो तर राष्ट्रवादीलाच सर्वाधिक फायदा होईल, ’ असं ‘पीपीटी’ (कॉर्पोरेट कंपन्यांच्या भाषेत ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’) म्हणे अजितदादांनी थोरल्या काकांसमोर केलेलं. मग काय, आजपर्यंतचा अनुभव बाजूला ठेवून काकांनी दादांवर विश्वास टाकलेला.कोरेगावात किरण बर्गेंना आज अकस्मात मुंबईत बोलवून घेण्यात आलं. गावोगावच्या शिवारात ‘कणसे’ फुलत असतानाच अकस्मातपणे काँग्रेस परिवारात आशेचा ‘किरण’ चमकला होता. मात्र, शेवटच्या क्षणी ‘कणसें’नाच लॉटरी लागली. लोकसभेच्या खर्चाचा ताळमेळ लावण्यात अजूनही मग्न असणाऱ्या जाधवांच्या पुरुषोत्तमांकडं बघून म्हणे ‘वाई-खंडाळ्यात कमळ’ फुललं. लोकसभेला मोदींची किटली जशी कऱ्हाडात फिरली होती, तसं मोदीचं कमळ वाईत फुलवण्याची संधी पक्षानं त्यांना स्वत:हून दिलीय. फलटणमध्ये मात्र, दिगंबरांची खेळी त्यांच्यावरच उलटलीय. महिनाभरापूर्वी ‘स्वाभिमानी’त मोठ्या थाटामाटानं प्रवेश केलेल्या आगवणेंना म्हणे आता पुन्हा एकदा काँग्रेसचा ‘अभिमान’ वाटू लागलाय; कारण फलटणचे हिंदुराव म्हणे, कधीच काँग्रेसच्या विरोधात जाणार नाहीत. तशीच गत पाटणच्याही हिंदुरावांची झालीय. पाटणच्या आमदारकीशी देणं-घेणं नसल्याच्या थाटात वावरणारे हिंदुराव अचानकपणे चर्चेत आलेत. त्यांनी बाबांच्या ‘राहुल’ला पाठिंबा दिलाय. पाटणचा राजकीय इतिहास बदलण्याची भाषा ढेबेवाडी खोऱ्यात घुमू लागलीय. कऱ्हाडात तर कुणालाच कुणाचा मेळ लागेनासा झालाय. आघाडी फुटली म्हणून ‘उत्तर’मध्ये बाळासाहेबांचा जीव कासावीस होऊ लागलाय, तर ‘दक्षिण’मध्ये त्यांचेच बंधू सुभाषराव यांचा चेहरा भलताच फुललाय. ‘उत्तर’मध्ये ‘धैर्यशील’तर म्हणे भलत्याच खुशीत गाड्या भरून गावोगावी पेढे वाटून आलेत. मात्र, ‘दादा..निवडणूक अजून व्हायचीय!’ असं कार्यकर्त्यांनी हळूच कानात सांगितल्यावर त्यांचे पाय जमिनीवर आलेत. अशा बऱ्याच गमती-जमती आजूबाजूला घडू लागल्यात. यावर आपला ‘वॉच’ आहेच म्हणा.----सचिन जवळकोटे