शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यातील वाखरीमधील काही ग्रामस्थ यात्रेपासून वंचित, उद्यापासून उपोषणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:29 IST

फलटण : वाखरी, ता. फलटण येथील यात्रेच्या पंचकमिटीने गावातील विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह दोनशेहून अधिक ग्रामस्थांना यात्रेत सहभागी करून ...

फलटण : वाखरी, ता. फलटण येथील यात्रेच्या पंचकमिटीने गावातील विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह दोनशेहून अधिक ग्रामस्थांना यात्रेत सहभागी करून घेण्यास नकार देऊन वाळीत टाकल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार तब्बल २० वर्षांपासून सुरू असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.याबाबत गावातील दोनशेहून अधिक नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाखरी गावातील भैरवनाथाची जत्रा दि. २३ एप्रिलपासून सुरू होणार असून पाच दिवसांची जत्रा भरते. परंतु गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ जत्रेच्या पंचकमिटीने गावातील अनेक नागरिकांची वर्गणी घेण्यास नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर यात्रेत ते सहभागी करून घेत नाहीत.आम्ही तुमची वर्गणी घेणार नाही तसेच जत्रेत तुम्हाला सहभागी होता येणार नाही. आला तर तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा पंचकमिटी देत असल्याने गावातील ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य सरपंच उपसरपंच तसेच दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे धाव घेऊन यात्रेमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याची तसेच वर्गणी पण घेण्याची विनंती केली आहे.याबाबतचे निवेदन देऊनही अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने दि. १४ रोजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषणास बसण्याचा इशारा वाखरी ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर वाखरी गावच्या सरपंच शुभांगी शिंदे, उपसरपंच अक्षय जाधव तसेच दोनशेहून अधिक ग्रामस्थांच्या साक्षऱ्या आहेत. आजच्या आधुनिक युगात जत्रेत सहभागी करून न घेण्याचा व वाळीत टाकण्याचा हा प्रकार वाखरी गावात अनेक वर्षे चालला असून प्रशासन पण वाळीत टाकण्याच्या प्रकाराबद्दल दखल घेत नसल्याबद्दल तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणारगेली वीस वर्षांहून अधिक काळ झाला. यात्रेमध्ये बहुसंख्य ग्रामस्थांना वाळीत टाकण्याचा प्रकार सुरू आहे. दरवर्षी वर्गणी देण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करतात. मात्र यात्रा पंच कमिटी सहभागी करून घेत नाही. यावेळी सहभागी करून न घेतल्यास मानवी हक्क आयोगाकडे जत्रा कमिटी आणि प्रशासनाविरोधात तक्रार करणार आहे.  शुभांगी शिंदे- सरपंच, वाखरीचर्चा सुरूवाखरी गावात जुनी जत्रा कमिटी आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद आहेत. दोन्ही बाजूंना आम्ही समजावून सांगत आहोत. त्यांची बैठक पण घेतली आहे. नवीन जत्रा कमिटी नेमून सर्वांना सामावून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. पोलीस पण त्यांच्या पद्धतीने समजावून सांगत आहेत. - डॉ. शिवाजी जगताप, प्रांताधिकारी, फलटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसर