शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

सोसायट्यांची स्वत:चीच आचारसंहिता ; अनेकांचा स्वत:हून घरातच थांबण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:49 IST

सजग नागरिकांमुळे संसर्ग टाळता येतोय-- शहरातील आणि उपनगरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. अनेक नोकरदार या सोसायट्यांमध्ये राहत असल्याने त्यांनी आपल्यासाठी स्वयंघोषित आचारसंहिता लावून त्याचे पालन करत आहेत.

ठळक मुद्देकोरोनाशी सामना : गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहनआजारी व्यक्ती व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्या.

सचिन काकडे।सातारा : शहरांमधील गृहनिर्माण सोसायट्या तसेच अपार्टमेंटमधील सोसायटीच्या संचालकांनी रहिवाशांसाठी काही महत्त्वाच्या आचारसंहिता घालून दिल्या आहेत. एका सोसायटीमधून लॉकडाऊनच्या काळामध्ये केवळ एकच व्यक्ती घराबाहेर जाऊन खरेदी करू शकते.

शहरातील पेठा तसेच नगरपालिकेच्या हद्दीबाहेरील गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र तसेच राज्य शासनाच्यावतीने वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने देखील कुणीही १४ एप्रिलपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी तसेच औषधे घेण्यासाठी जे लोक घराबाहेर पडतात, त्यांनी पुरेसी खबरदारी घ्यावी. तोंडाला रुमाल अथवा मास्क लावावे. खिशामध्ये सॅनिटायझर ठेवावेत तसेच खरेदी केल्यानंतर घरी परतल्यावर प्रत्येकाने साबणाने हात धुवावेत, अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे संशयास्पद नजरेने बघितले जाते. संबंधित व्यक्तींना स्वच्छतेबाबतची योग्य ती काळजी घेतली का, ही चिंताही सोसायटीमधील इतर नागरिकांनाही भेडसावते. या पार्श्वभूमीवर शहर तसेच उपनगरातील सोसायट्यांनी काही आदर्श आचारसंहिता तयार केल्या आहेत. बहुतांश सोसायट्यांमध्ये आदर्श आचारसंहितेबाबतचे फलक दर्शनीस्थळावर लावण्यात आले आहेत तसेच या फलकांवर अध्यात्मिक माहिती, सुविचार लिहून लोकांचे प्रबोधनही केले जात आहे.

घराला कूलूप अन् गेटला कडीसोसायटीमधील नागरिकांनी वारंवार बाहेर पडू नये, यासाठी आचारसंहिता लावण्यात आली असून अनेकांनी आपल्या गावी जाणे पसंद केले आहे. मात्र, जे सोसायटीत राहतात ते दिवसभर स्वत:ला घरामध्येच ठेवतात आणि गेटला कडी लावून गरज असल्यासच बाहेर जाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे कधी न भेटणारी नोकरदार मंडळी सध्या संध्याकाळी आपापल्या गॅलरीत दिसू लागलीय.

अशा आहेत सूचना

  • घरातील कोणीतरी एकच व्यक्ती ठरवा जी २१ दिवसांत गरज असेल तेव्हाच बाहेर जाईल.

प्रत्येक वेळी बाहेर जाण्यासाठी फुल्ल भायाचा एकच ड्रेस वापरणे. आल्यानंतर तो धुवून सुकवणे. बाकीच्या कपड्यात मिक्स करू नये.बाहेर जाण्यासाठी एकच पर्स वापरणे. त्यामधीलच नोटा, कॉईन्स आणि कार्डस् वापरावे. हे सर्व दुसऱ्या पर्समध्ये मिक्स करू नये.शॉपिंग बॅगपण प्रत्येक वेळी एकच वापरावी.

  • शक्यतो पायी चालत जावे. चारचाकी किंवा दुचाकीची आवश्यकता असेल तर एकच वाहन २१ दिवस वापरावे. चारचाकी किंवा दुचाकी, सायकल, रिक्षा, बस, रेल्वेने प्रवास शक्यतो टाळावा. गर्दी असेल त्याठिकाणी खरेदी करणे टाळा. खरेदी करताना योग्य अंतर ठेवा.
  •  
  • जिन्याचा वापर करताना आपले हात आजूबाजूला लावू नका. तुमच्या आधी कोणी तरी त्याठिकाणी हात लावलेले असतील.

मोबाईल शक्यतो नेऊ नये. नेलाच तर आल्यावर सॅनिटायझरने पुसून घ्यावा. तसेच आपले हात-पाय चेहरा स्वच्छ धुवून कपडे लगेच बदलावे. हे कपडे स्वतंत्र धुवावे. दुसऱ्या कपड्यात मिक्स करू नये. बाहेर जाण्यासाठी वापरलेले कपडे, शॉपिंग बॅग, पर्स, गाडीची चावी एका बॅगमध्ये ठेवणे.

  • सारखे बाहेर जाऊ नये. एकदाच सर्व काही घेऊन येणे.

आपल्या सोसायटीतील सर्वांचे कोरोनापासून आपल्या सर्वांनाच संरक्षण करायचे आहे.संरक्षण त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणे टाळा.आपल्या घरातील लहान मुले, आजारी व्यक्ती व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्या.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSatara areaसातारा परिसर