शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..तर मी ‘रिपाइं’चे अध्यक्षपद सोडायला तयार; मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

By नितीन काळेल | Updated: October 3, 2024 17:33 IST

देशात समान नागरी कायदा यायला हवा 

सातारा : ‘रिपाइं’मध्ये अनेक गट आहेत. यामध्ये आमचीच ‘रिपाइं’ खरी आहे. त्यामुळे सर्वांनी आपापले गट बरखास्त करुन आमच्या ‘रिपाइं’त सहभागी व्हावे. प्रकाश आंबेडकर यांनीही ‘वंचित’ बरखास्त करावी. पक्षाचे ते अध्यक्ष होणार असतील तर मीही अध्यक्षपद सोडायला तयार आहे. तसेच देशात समान नागरी कायदा यायला हवा, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते. सातारा येथे ‘रिपाइं’चा मेळावा होता. यासाठी मंत्री आठवले आले होते.मंत्री आठवले म्हणाले, आमचा ’रिपाइं’ पक्ष देशात आहे. ‘रिपाइं’तील सर्व गट एकत्र आलेतर ताकद वाढणार आहे. कारण, एकेवेळी राज्यात चार खासदार निवडूण आले होते. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी सर्वजण एकत्र आले तर राज्यात मोठी ताकद उभी राहील. कारण स्वतंत्र लढून काहीच फायदा होत नाही.विधानसभा निवडणुकीसाठी ‘रिपाइं’ने २१ जागांची यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहे. आम्हाला ८ ते १० जागा मिळाव्यात ही अपेक्षा आहे, असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, महायुतीत आमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. आम्ही त्यांच्याबरोबर असल्याने गृहीत धरतात हे खरे. पण, त्याचबरोबर सन्मानही मिळायला हवा. आताच्या निवडणुकीत महायुती १७० जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल.

मंत्री आठवले म्हणाले..

  • राज्यात ‘रिपाइं’ला दोन महामंडळांची जबाबदारी मिळावी
  • राज्यपाल नियुक्त आमदारपदी एकाची नियुक्ती करावी
  • देशात समाननागरी कायदा यायला हवा. हिंदू-मुस्लीम समाज एकत्र आणण्यासाठी फायदा होईल
  • वक्फ बोर्ड कायद्यामुळे मुस्लीम समाजाचा फायदा होईल.
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये बहुमत घ्यावे. भारताबरोबर राहण्याची जनतेची इच्छा आहे.
  • पाकिस्तानने काश्मीरमधील आतंकवाद, घुसखोरी थांबवावी.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर