शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरेऽऽऽ पाचगणीत वॉशिंग मशीनमध्ये सापडला साप, कुटुंबीयांची उडाली घाबरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:32 IST

ॲनिमल रेस्क्यू टीमकडून सुरक्षित सुटका

पाचगणी : पाचगणी शहरातील एका घरातील वॉशिंग मशीनमध्ये चक्क साप आढळून आला. यामुळे कुटुंबीयांची एकच घाबरगुंडी उडाली. तत्काळ ॲनिमल रेस्क्यू टीमशी संपर्क साधला असता त्वरित रेस्क्यूअर राजेश चौरसिया आणि गणेश शेलार घटनास्थळी दाखल होऊन वॉशिंग मशीन मधील सापाची सुटका केली. ही घटना बुधवारी रात्री घडली.पाचगणी येथील एका घरात नेहमीप्रमाणे घरगुती कामासाठी मशीन उघडताच आत साप असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ खबरदारी घेत घराबाहेर सुरक्षित अंतरावर थांबून ॲनिमल रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच रेस्क्यूअर राजेश चौरसिया आणि गणेश शेलार हे उशिरा रात्री घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रथम परिस्थितीचा शांतपणे आढावा घेत कुटुंबीयांना धीर दिला. वॉशिंग मशीनची रचना, सापाची हालचाल आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक सुटका मोहीम राबविण्यात आली.अरुंद जागेत लपलेल्या सापाला कोणतीही इजा न होऊ देता आणि घरातील सदस्यांची सुरक्षितता अबाधित ठेवत रेस्क्यूअरनी कौशल्याने त्याला बाहेर काढले. संबंधित साप हा ‘पहाडी तस्कर’ (Montane Trinket Snake) प्रजातीचा असल्याचे ओळखण्यात आले. हा पाचगणी परिसरात आढळणारा सामान्य बिनविषारी साप असून तो माणसांसाठी निरुपद्रवी आहे. पर्यावरणीय संतुलन राखण्यात या सापाची महत्त्वाची भूमिका असते. विशेषतः उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास तो उपयुक्त ठरतो.सुटकेनंतर सापाची प्राथमिक तपासणी करून त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Snake found in washing machine in Panchgani; family terrified.

Web Summary : A snake was discovered inside a washing machine in Panchgani, causing panic. Animal rescuers safely removed the non-venomous Montane Trinket Snake and released it back into its natural habitat after ensuring it was unharmed.