शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहावर्षीय अनंत जाधवने केले दोन किलोमीटरचे अंतर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:13 IST

वडूज येथे रनर्स फाउंडेशनच्यावतीने माणदेश मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मायणीतील सुमारे ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अनंत जाधव या सहा वर्षांच्या स्पर्धकाने दोन किलोमीटरचे अंतर पार केले. यावेळी आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

ठळक मुद्देसहावर्षीय अनंत जाधवने केले दोन किलोमीटरचे अंतर पूर्णवडूज येथील मॅरेथॉनमध्ये सहभाग : ललिता बाबरकडून चिमुकल्याचे कौतुक

संदीप कुंभारमायणी : वडूज येथे रनर्स फाउंडेशनच्यावतीने माणदेश मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मायणीतील सुमारे ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अनंत जाधव या सहा वर्षांच्या स्पर्धकाने दोन किलोमीटरचे अंतर पार केले. यावेळी आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.ही मॅरेथॉन २१ किलोमीटर, ५ किलोमीटर व २ किलोमीटर धावणे अशी होती. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. मायणी येथील प्राथमिक शाळेतील पहिलीमधील विद्यार्थी अनंत जाधव याने या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. दोन किलोमीटर अंतर त्याने एवढ्या लहान वयात पूर्ण केले.प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण जन्मत:च असतात; पण ते आपल्याला दिसत नसतात. या गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या यशाचे गमक कशात आहेत, हे पाहणे गरजेचे असते. मुले मैदानी खेळ कशी खेळतील? याकडे मायणी जिल्हा परिषद शाळेचे अधिक लक्ष असते.

शिवाय मुलाच्या अन्य आवडीच्या गोष्टींवरही प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या या पहिलीतील अनंत जाधवने मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमध्ये दोन किलोमीटर अंतर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेत ते पूर्ण केले. त्याचे कौतुक करत आदी मुलांना प्रोत्साहन, प्रेरणा व सुप्त गुणांना वाव देणे सारखेच आहे, असे ललिता बाबर यांनी सांगितले.मायणी जिल्हा परिषद शाळेकडून अनंत जाधवने वडूज येथील रनर्स फाउंडेशनच्यावतीने आयोजित माणदेश मॅरेथॉनचे स्पर्धेमध्ये सहभागी घेतला. त्याने दोन किलोमीटर अंतर पूर्ण केल्याबद्दल त्याचा यथोचित सन्मान व सत्कार केला.मायणी येथील फ्रेंडस ग्रुपचे अध्यक्ष सयाजी जाधव व त्यांची दोन मुले आहेत. एक संस्कार दहा वर्षे व अनंत सहा वर्षांचा आहे. या पिता-पुत्रांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अनुक्रमे पाच व दोन किलोमीटर अंतर पूर्ण केले. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSatara areaसातारा परिसर