शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तिहेरी अपघातात सहाजण गंभीर

By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST

वाठारनजीक दुर्घटना : महामार्गावर थांबलेल्या ट्रकला टँकर, कारची धडक

मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी दुपारी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या नादुरुस्त ट्रकला टँकर व त्यापाठोपाठ कारने धडक दिली. या अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धैर्यशील बजरंग पाटील (वय ३५, रा. कामेरी, ता. वाळवा), श्वेता मोहन सुतार (१६), ओमकार मोहन सुतार, शुभम मोहन सुतार (तिघेही रा. पणुंब्रे, ता. शिराळा), मारुती अप्पा लोखंडे, राधिका उत्तम मोरे (दोघेही रा. जयसिंगपूर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेशनिंगचे धान्य घेऊन कोल्हापूरला निघालेला ट्रक नादुरुस्त झाल्याने रविवारी दुपारी चालकाने वाठार गावच्या हद्दीत महामार्गावरच थांबविला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या दूध टँकर (एमएच १० एडब्ल्यू ७४७४)वरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकरची महामार्गावर थांबलेल्या ट्रकला जोराची धडक बसली. दरम्यान, टँकरच्या पाठोपाठ चंदूर (ता. हातकणंगले) गावाला निघालेल्या कारची अपघातग्रस्त टँकरला धडक बसली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांसह महामार्ग देखभाल विभागाचे गजानन सकट, अमोल भिसे, अर्जुन सूर्यवंशी, राजू खैरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी टँकरसह कारमधील जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी टँकरचालकासह सोळा वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी) टायर फुटल्याने कार पुलावरून कोसळली केसुर्डीनजीक अपघात : कोल्हापूरचे पाचजण गंभीर; रुग्णालयात उपचार सुरू; कामगाराच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील केसुर्डी, ता़ खंडाळा गावानजीक महामार्गाचे सुरू असलेल्या अर्धवट पुलावरून टायर फुटल्याने एक कार सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. १४) दुपारी दोनच्या सुमारास घडला. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील जाधव कुटुंबीय कारने (एमएच ०९ एस ८०७६) कोल्हापूरहून पुण्याकडे निघाले होते. संबंधित कार ऋतुराज किशोर जाधव (वय २०) चालवत होता़ केसुर्डी गावानजीक असणाऱ्या राजश्री बागेजवळील महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. कार याठिकाणी आली असता अचानक कारचा टायर फुटला. कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलावरून थेट २५ फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात ऋतुराज जाधवसह किशोर जाधव (वय ५५), स्नेहल जाधव (४५), मिनल जाधव (२५) व सायली जाधव (२६) हे सर्वजण जखमी झाले. जखमींमध्ये स्रेहल जाधव गंभीर जखमी झाल्या आहेत़ कार ज्या खड्ड्यात कोसळली तो खड्डा पावसाच्या पाण्याने पूर्णपणे भरला होता. अपघातावेळी घटनास्थळी असणाऱ्या एका कामागाराने चपळाईने खड्ड्यात उतरून कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिरवळ पोलिसांनी नागरिकांच्या व खंडाळा रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी)