शहरं
Join us  
Trending Stories
1
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
2
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
3
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
4
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
5
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
6
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
7
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
8
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
9
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
10
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
11
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
12
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
13
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
14
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
15
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
16
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
17
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
18
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
19
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
20
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: उमेदवारांचे लोटांगण; कार्यकर्त्यांचे तुफान आलंया, प्रचारासाठी उरले सहा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:48 IST

उमेदवारांकडून पदयादात्रा काढत ‘हाेम टू हाेम’ प्रचार

वैभव पतंगेसातारा : पालिका निवडणुकांचा फिव्हर चांगलाच वाढला आहे. आता प्रचारासाठी केवळ सहा दिवस राहिले असल्याने उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. काॅर्नरसभा, पदयादात्रा काढत ‘हाेम टू हाेम’ प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. प्रचारादरम्यान उमेदवाराकडून पाठीशी राहा, असे आवाहन केले जात आहे.नाेकरी-व्यवसायानिमित्त परगावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क केला जात आहे. ‘भाऊ तेवढं लक्ष असू द्या, यंदा आपली उमेदवारी आहे,’ असे म्हणत मतदारांना साद घातली जात आहे. अनेकजण तर मतदाराच्या पाया पडून आशीर्वाद देण्याची मागणी केली जात आहे, तर कार्यकर्त्यांकडूनही तुफान आलंया म्हणत आमच्या भाऊलाच पाठीशी राहण्याचे आवाहन केले जात आहे.सातारा जिल्ह्यातील नऊ पालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकांमुळे आराेप-प्रत्याराेपाने राजकीय वातारण ढवळून निघाले आहे. यंदा बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका हाेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांनी उडी घेत खरी रंगत आणली आहे. मात्र त्यांना अद्याप निवडणूक चिन्हच नसल्याने प्रचारात गाेची हाेत आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर व पाचगणी वगळता भाजप व इतर पक्षांतच सामना रंगला आहेत तर काही ठिकणी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिंदेसेनेच कुस्ती हाेत आहे.प्रचारासाठी उरले सहा दिवसयंदा प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला आहे. दि. २ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ सहा दिवसच शिल्लक राहिले आहेत. सहा दिवसांत संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहेे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पाेहोचण्यासाठी धावाधाव करत आहेत. काहींनी मतदारांशी थेट संपर्क ठेवण्यासाठी माणसंही नेमली गेली आहेत. वरिष्ठ नेत्यांची प्रभागात सभा आयाेजित करता येतील, यांचे नियाेजन केले जात आहे. कार्यकर्त्यांकडून मतदार याद्या चाळण्याचे काम जाेरात सुरू आहे.

पंगती, तर कुठे लक्ष्मीदर्शन !यंदा नगरसेवक हाेण्याचा चंग बांधलेल्या उत्साही कार्यकर्त्यांकडून जेवणावळीच्या पंगती उठविल्या जात आहे. तर काही ठिकाणी लक्ष्मी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असली तरी अद्याप लक्ष्मीदर्शन सुरू केले नाही. प्रचाराच्या शेवटच्या क्षणी याचा वापर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Local Elections Heat Up: Candidates Campaign Hard, Six Days Left

Web Summary : With only six days left, Satara's local election campaigns intensify. Candidates are holding rallies and going door-to-door, seeking support. Voters are being contacted, and blessings sought. Political atmosphere charged with accusations as excitement grows for these long-awaited elections.