महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये एप्रिल-मे व दिवाळी हंगामात पर्यटकांची होणारी मोठ्या प्रमाणात गर्दी, हजारोंच्या संख्येने येणारी वाहने महाबळेश्वर शहरात दाखल होतात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. यामुळे येणारे पर्यटक व स्थानिक टॅक्सीवाल्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. यासाठी दोन वर्षांपूर्वी महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा धूळखात पडलेली आहे.महाबळेश्वरच्या नाताळ व ३१ डिसेंबर हंगाम तोंडावर आला असतानाच महाबळेश्वर येथे दरवर्षी दहा लाख पर्यटक निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. साधारणपणे २० डिसेंबरपासून नाताळ हंगामास प्रारंभ होतो व हळूहळू पर्यटकांची संख्या वाढते. वाढत्या गर्दीमुळे येथे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वाहतुकीची कोंडी ही बाब आता नित्याचीच झाली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेने साधारण दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा धूळखात पडलेली आहे. हे सिग्नल वेण्णा लेकच्या दिशेन येणारी वाहने, मेढा मार्गे येणारी वाहने, शहरातून येणारी वाहने माखरिया गार्डनजवळ बसविण्यात आली, तर दुसरी सिग्नल यंत्रणा पंचायत समितीसमोर इराणी पेट्रोल पंप जवळ बसविण्यात आली आहे. हे सिग्नल बसविण्यात आल्यानंतर दोन दिवस कारवाईचे नाटक केले व पुन्हा तिसऱ्या दिवसांपासून तिकडे कोणीही लक्ष देत नाही. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवून देखील ही पालिका प्रशासन व पोलीस खात्याकडून सिग्नलचे नियमाबाबत दुर्लक्षच होत आहे. (प्रतिनिधी)उपाययोजनेची मागणीनाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या महाबळेश्वरात वाहतुकीची उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे. पर्यटकांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असणाऱ्या या बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दोन वर्षांपासून सिग्नल यंत्रणा धूळखात
By admin | Updated: December 16, 2014 00:04 IST