शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाहन वितरकांच्या ८० दुकाने बंद , विक्रीत २५ ते ३० टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 17:45 IST

सध्या देशात सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदीच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये विशेषत: वाहन निर्मिती व विक्री क्षेत्रात त्याचे तीव्र परिणाम दिसू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात दुचाकी, कार, मालवाहतूक व कृषी वाहनांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली असून, ४० वितरकांची दुकाने बंद पडली आहेत. त्यामुळे या दुकानांमध्ये काम करणारे सेल्समन, अकाऊंटंट आदींवर बेरोजगारीची कुऱ्हाडकोसळली आहे.

ठळक मुद्देवाहन वितरकांच्या ८० दुकाने बंद, विक्रीत २५ ते ३० टक्क्यांची घट सेल्समन, अकाऊंटंटवर कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड 

स्वप्नील शिंदे सातारा : सध्या देशात सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदीच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये विशेषत: वाहन निर्मिती व विक्री क्षेत्रात त्याचे तीव्र परिणाम दिसू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात दुचाकी, कार, मालवाहतूक व कृषी वाहनांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली असून, ४० वितरकांची दुकाने बंद पडली आहेत. त्यामुळे या दुकानांमध्ये काम करणारे सेल्समन, अकाऊंटंट आदींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.गेल्या वर्षभरापासून देशातील वाहनक्षेत्रात निर्माण झालेल्या मंदीची झळ वाहननिर्मात्या कंपन्यांना बसत असताना याचा सर्वाधिक परिणाम वाहन कंपन्यांच्या वितरकांवर दिसून येत आहे. मागील एक वर्षापासून विक्रीत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे. आधी महिन्याला ५५ ते ६० कार विकल्या जात.

आता ४० ते ४५ गाड्यांची विक्री होते. तर दुचाकी विक्री ६०० वरून ४५० ते ५०० वर आली आहे. व्यवसाय कमी झाल्याने तीन कामगारांना कमी केले. १८ महिन्यांत सातारा जिल्हा क्षेत्रातील ४० वितरकांची दुकाने बंद पडली असून, तेथे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.जिल्ह्यातील दुचाकी व कार विक्रीमध्ये कमालीची घट झाली आहे. काही महिन्यांपासून चौकशीसाठीही ग्राहक येत नाही. वितरकांचा खर्च वाढल्याने ग्रामीण भागातील दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी कामगार कपात केली आहे.दुकाने बंद होण्याची कारणे

  • वस्तू व सेवा करवाढ १८ टक्क्यांवरून २८ टक्के
  • वाढलेले नोंदणी शुल्क
  • पाच वर्षांच्या वाहन विम्याची सक्ती
  • वाहनांच्या ‘आॅन रोड’ किमतीत भरमसाठ वाढ
  • वितरकांच्या मार्जीनमध्ये घट
  • इलेक्ट्रीक वाहनांची वाढती संख्या

नोटाबंदीनंतर बाजारातील पैशाचा प्रवाह कमी असणे, विमा किमतीतील वाढ, पेट्रोल- डिझेलच्या किमतीतील वाढ तसेच इलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे.- सचिन शेळके,अध्यक्ष, आॅटोमोबाईल डिलर्स असोसिशन

 

टॅग्स :carकारSatara areaसातारा परिसर