श्रीराम मंदिर सांस्कृतिक राजधानी बनेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:33 AM2021-01-15T04:33:26+5:302021-01-15T04:33:26+5:30

सातारा : श्रीराम जन्सभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्या येथील मंदिर निर्माणासाठी निधी संकलन अभियान सुरू होणार आहे. हे मंदिर जगातील ...

Shriram Temple will become the cultural capital | श्रीराम मंदिर सांस्कृतिक राजधानी बनेल

श्रीराम मंदिर सांस्कृतिक राजधानी बनेल

Next

सातारा : श्रीराम जन्सभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्या येथील मंदिर निर्माणासाठी निधी संकलन अभियान सुरू होणार आहे. हे मंदिर जगातील संस्कृतिक राजधानी बनेल,’ असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केला.

सातारा येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परांडे म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी श्री राम जन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन केले. प्रस्तावित मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फुटांची असेल. मंदिराची एकूण उंची १६१ फूट असेल, लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट असेल. त्यावर पाच शिखर असतील. हे मंदिर २.७ एकर जागेवर होईल. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांचे असेल. सिमेंट व लोखंडाचा वापर यात होणार नाही.

मंदिर उभारणीसाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत निधी समर्पण आभियान देशभर राबविले जात आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गावे तसेच ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक पारदर्शिता रहावी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने पावती पुस्तके व कूपन्सची रचना करून त्यामाध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात हे अभियान दि. १५ ते ३१ जानेवारी या कालावधित होणार आहे. अशी माहितीही परांडे यांनी दिली.

Web Title: Shriram Temple will become the cultural capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.