शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिमय वातावरणात श्रीराम रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:48 IST

फलटण : संस्थान काळापासून सुरू असलेली येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो ...

फलटण : संस्थान काळापासून सुरू असलेली येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. दरम्यान, रथ प्रदक्षिणेच्या मार्गावर शहरवासीयांनी रथमार्गावर सडारांगोळ्या घालून प्रभू श्रीरामाचे स्वागत केले.नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे २५० वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा आजही परंपरागत पद्धतीने सुरू आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. बुधवारी सकाळी आठ वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीता मातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.फळे, फुले, पाने आणि विविधरंगी निशाणे लावून उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. श्रीराम मंदिरापासून नगर प्रदक्षिणेसाठी निघालेल्या या रथाचे शिंपी गल्लीतून बारामती चौकमार्गे नगरपरिषद कार्यालयासमोरील चौकात आगमन झाले. यावेळी नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्षा नीता नेवसे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे, पाणी पुरवठा सभापती ज्योत्स्ना शिरतोडे, नगरसेविका सुवर्णा खानविलकर, अधिकार व कर्मचाऱ्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.त्यानंतर रथयात्रा ज्ञानेश्वर मंदिर, गोविंद महाराज उपळेकर मंदिर, डेक्कन चौक, महात्मा फुले चौक, मारवाड पेठ मार्गाने बारस्कर चौक, रंगारी महादेव मंदिरापासून बाणगंगा नदीपात्र, मलटण भागातील सद्गुरू हरिबुवा मंदिरापासून फिरत गजानन चौक या मार्गाने सायंकाळी पुन्हा श्रीराम मंदिरासमोरील रथखाण्यात पोहोचला. यावेळी राजघराण्यातील विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप पोमन पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ यांच्यासह राजघराण्यातील मानकरी व भाविक उपस्थित होते.