शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

भल्या पहाटे डोंगरावर ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Updated: April 19, 2017 23:06 IST

वॉटर कप जिंकणारच : जायगावकरांचा निर्धार; गटतट विसरून एकत्र, पाणीदार गावासाठी कंबर कसली

औंध : जानेवारी, फेब्रुवारी महिना आला की ओढे, नाले आटतात. साडेतीनशे, चारशे फुटांवरील कूपनलिका कोरड्या पडतात. पाणीटंचाईमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून टँकरशीही नाते दृढ झालेले. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रचंड चटके सोसलेले जायगावकर पाणी बचतीसाठी कमालीचे जागृत झाले. त्यातूनच गाव पाणीदार करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ एकवटले आहेत. भल्या पहाटे ग्रामस्थ डोंगरावर जाऊन काम करीत आहेत. जायगावला मोठी नैसर्गिक देणगी लाभली आहे. उत्तर दिशेचा अपवाद वगळता तिन्ही बाजूंनी डोंगर आहे. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पाणी अडवले नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. दरवर्षी गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या चार वर्षांत कूपनलिका खोदून काहीजणांनी पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पाण्याची पातळी खालावल्यामुळे कूपनलिका कोरड्या पडल्या असून, पाण्यासाठी घातलेले लाखो रुपये वाया गेले आहेत. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या जायगावकरांना पाण्याचे महत्त्व समजल्याने गाव व परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरवून गाव पाणीदार करण्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला. या जलसाक्षर चळवळीत सहभागी होण्यासाठी लहानांपासून आबालवृद्ध सरसावले आहेत. भल्या पहाटे टिकाव, खोरे, पाटी घेऊन लोक डोंगर गाठतात. पाणी फाउंडेशनची गावात धूम असून, ओढ्याचे खोलीकरण, गाळ काढणे, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी खड्डे काढण्यात आले आहेत. डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी (डिप सीसीटी) समतल चर खोदण्याचे काम सुरू आहे. गाव पाणीदार करून वॉटर कप जिंकायचा या इर्षेने झपाटलेले ग्रामस्थ राजकीय मतभेद बाजूला सारून पाण्यासाठी राबत आहेत. (वार्ताहर) शासनावर अवलंबून न राहता देणगी...‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेत ग्रामस्थांनी ऐक्याची वज्रमूठ आवळली असून, श्रमदानाबरोबर लोकवर्गणीतून गाळ काढणे, खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. निधीसाठी शासनावर अवलंबून न राहता सर्व स्तरांतून लोकांनी देणगी गोळा करून कामाला वेगाने सुरुवात केली आहे. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग...पाणी फाउंडेशनच्या कामाला गती आल्याने गावागावात पाणीदार चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसुद्धा सरसावले आहेत. पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, तहसीलदार पवार-कार्डीले याशिवाय औंध पोलिस स्टेशनची टीमसुद्धा या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेत सहभागी झाली आहे.