शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन एकटेच खाता म्हणत निवृत्त डीवायएसपीला मुलाने बेल्टने बदडले, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Updated: April 20, 2023 16:45 IST

आशिष दादासाहेब गोडसे (वय ३९), रेखा दादासाहेब गोडसे (वय ५८) अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकाची नावे आहेत.

सातारा : ‘आलेली पेन्शन तुम्ही एकटेच खाता मला का देत नाही,’ असे म्हणत निवृत्त डीवायएसपीला त्यांच्या मुलाने बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना शाहूपुरी परिसरातील गुलमोहर काॅलनीत दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी मुलासह त्याच्या आईवरही शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष दादासाहेब गोडसे (वय ३९), रेखा दादासाहेब गोडसे (वय ५८) अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकाची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दादासाहेब वामन गोडसे (वय ६७, रा. अनुसया गुलमोहर काॅलनी, शाहूपुरी सातारा) हे पोलिस दलातून डीवायएसपी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. अद्यापही ते पोलिस प्रशासनाला गुन्हेगारांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासंदर्भात मार्गदर्शन करतात. त्यामुळे ते पुणे, मुंबईला सतत फिरतीवर असतात.

दोन दिवसांपूर्वी ते साताऱ्यातील आपल्या घरी आले. दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरात ते पेपर वाचत बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा आशिष गोडसे याने पेन्शन तुम्ही एकटेच खाता. मला का देत नाही, असे म्हणत बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने काठीने त्यांच्या पायावर, हातावर, पाठीवर बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर मुलगा त्यांना मारहाण करत असताना गोडसे यांची पत्नी रेखा हिने त्यांचे हात धरून मुलाला मारहाण करण्यास मदत केली. यामध्ये गोडसे हे गंभीर जखमी झाले. साऱ्या पाठीवर मारहाणीचे वळ उठले. जखमी अवस्थेत ते स्वत: शासकीय रुग्णालयात दाखल झाले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात मुलगा आणि पत्नीच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा आशिष गोडसे आणि पत्नी रेखा गोडसे यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. निवृत्त पोलिस अधिकारी गोडसे यांनी सांगितले की, मुलगा  इंजिनिअर असून एकुलता एक आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर