शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : मुलानेच केला आईवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 19:20 IST

नात्याला काळीमा फासणारी घटना वाई तालुक्यातील एका गावात घडली असून, मुलानेच आईवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन संबंधित मुलाला अटक केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : मुलानेच केला आईवर अत्याचारवाई तालुक्यातील खळबळजनक घटना

वेळे : नात्याला काळीमा फासणारी घटना वाई तालुक्यातील एका गावात घडली असून, मुलानेच आईवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन संबंधित मुलाला अटक केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावात पीडित महिला व तिचा पती आणि २८ वर्षाचा मुलगा वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पन्नास वर्षीय असलेली पीडित महिला (आई) ही गावातील लग्न असलेल्या एका नवरदेवाच्या घरातून जेवण करून घरी आली. त्यावेळी तिचा मुलगा घराच्या शेजारील कट्ट्यावर बसलेला होता.

आई घरात गेलेली पाहून तो आईच्या पाठोपाठ घरात गेला. त्याने आईचा गळा दाबून जबरदस्तीने आईवर अत्याचार केला. आईने आरडाओरड करून मला सोडवा.. मला सोडवा, अशी याचना केली. आईच्या किंकाळ्या ऐकून शेजारील इतर महिला घराजवळ आल्या. त्यांनी घराचे दार उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दार न उघडल्याने त्यांनी अखेर गावात जेवण करण्यास बसलेल्या पीडित महिलेचे पतीला बोलावून आणले. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. मुलाच्या तावडीतून सुटका करून पत्नीला त्यांनी घराबाहेर आणले. चिडलेल्या मुलाने वडिलांना दगडाने व लाथा बुक्याने जबर मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेद्वारे आईला आणि वडिलांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने भुर्इंज पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन संबंधित मुलाला अटक केली. या प्रकरणाचा गतिमान तपास व्हावा, यासाठी महिला फौजदार अमृता राजपूत यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.त्याला फासावर लटकवा...आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्यां मुलाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. वाई तालुक्यात काही दिवसांपूर्वी प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईनेच मुलाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच वाई तालुक्यामध्येच मुलाने जन्मदात्या आईवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही घटनांमुळे वाई तालुक्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर