शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रंग देताना शॉक लागून जखमी -वणवा विझवताना एक जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:25 IST

शाहूपुरी येथील राहत्या घराला रंग देताना शिवाजी जिजाबा करपे (वय ६०, आझादनगर, शाहूपुरी, सातारा) हा शॉक लागून जखमी झाला.

ठळक मुद्देसुनिल पाटोळे याला ताब्यातजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार

सातारा : शाहूपुरी येथील राहत्या घराला रंग देताना शिवाजी जिजाबा करपे (वय ६०, आझादनगर, शाहूपुरी, सातारा) हा शॉक लागून जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरी येथील आझादनगरमध्ये राहणारे शिवाजी जिजाबा करपे हे आपल्या घराला दुपारी साडेचार वाजता आतून रंग देत होते. यावेळी रंग देताना हातातील ओला ब्रश हा इलेक्ट्रीक वायरला लागला. त्यामुळे त्यांना जोराचा विजेचा शॉक बसला. त्यांच्या हाताला व पोटाला भाजले त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये ते ५० टक्के भाजले आहेत.

वणवा विझवताना एक जखमी सातारा : येथील मंगळवार पेठेतील बोगदा परिसरात राहत्या घराजवळ वणवा पेटल्याने तो विझवताना सचिन रामचंद्र जांगळे(वय १८,) हा भाजून जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोगदा परिसरामध्ये अज्ञाताने वणवा पेटविला. हा वणवा विझविण्यासाठी सचिन पुढे सरसावला. त्याच्या घरापर्यंत त पेटत आला. यामध्ये आपले घर पेटू नये म्हणून सचिन जांगळे या तरुणाने हा वणवा विझवण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्याचे दोन्ही हात व पायांचे पंजे भाजून तो जखमी झाला. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘ड्राय डे’ला दारु अड्ड्यावर छापा 

सातारा : शासनाने रविवारी ड्राय डे घोषित केला होता. असे असतानाही येथील सातारा चिकन सेंटरच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला बेकायदा दारु विक्री चालू होती. या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सुनिल लक्ष्मण पाटोळे (वय ३६, रा. कोंडवे, ता. सातारा), शुभम राजू कांबळे (रा. राधिकारोड सातारा), राजू जगप्पा कांबळे (रा. राधिकारोड सातारा) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी सुनिल पाटोळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून देशी दारूच्या २७ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर