शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

‘शिवसागर’ २१ वर्षांनी आटला!

By admin | Updated: June 10, 2014 02:14 IST

बोटी बंद : पर्यटकांचा ओघ रोडावला; हॉटेल व्यवसाय ठप्प; डोंगराळ भागातील ग्रामस्थांना करावी लागतेय कोरड्या पात्रातून पायपीट

सातारा : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा भेगाळलेला तळ तब्बल २१ वर्षांनंतर दिसू लागला आहे. पाण्याची पातळी १९९३ नंतर प्रथमच इतकी खालावली असून, त्यामुळे बामणोली-तापोळा भागातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. बोटी बंद झाल्यामुळे परिसरातील तीन नद्यांच्या खोऱ्यांत वसलेल्या अनेक दुर्गम गावांमधील ग्रामस्थांना शिवसागराच्या आटलेल्या पात्रातून मोठी पायपीट करावी लागत आहे. जलाशयातील पाणी खूपच कमी झाल्यामुळे बामणोली आणि तापोळा या ठिकाणचे तीनही बोट क्लब बंद आहेत. बामणोलीत ‘भैरवनाथ’, तर तापोळ्यात ‘विशाल’ आणि ‘शिवसागर’ असे दोन बोट क्लब आहेत. जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या गावांतील ग्रामस्थांना ये-जा करण्याचे होड्या आणि लाँचेस हे एकमेव साधन आहे. काही नौका जिल्हा परिषदेनेही पुरविल्या आहेत. तथापि, त्यातील एकही आता पाण्यात दिसत नाही. सर्व नौका किनाऱ्यावर आणून ठेवण्यात आल्या आहेत. या विभागात तीन खोरी आहेत. सोळशी आणि कोयनेचा संगम तापोळ्याजवळ होतो, तर कोयना आणि कांदाटी नद्यांचा संगम शेंबडीजवळ होतो. या संगमांपर्यंत पाणी आटले असल्याने त्यापलीकडे असणाऱ्या गावांचा जलमार्ग बंद झाला आहे. यापैकी एका खोऱ्यात दरे, गाडवली, पिंपरी, अकल्पे, निवळी, लामज, वाघावळे, उचाट, कांदाट, काळोशी, म्हाळुंगे, चकदेव आदी दुर्गम गावे आहेत. बामणोलीपासून पुढे एका खोऱ्यात वाळणे, अहीर, पाली, खरोशी, रेणोशी आदी गावे आहेत. तिसऱ्या खोऱ्यात शिंदी, रवदी, अरव, कुसापूर, शेलटी, खिरखंडी अशी गावे आहेत. यातील काही गावांना जोडणारे मार्ग अनुक्रमे बामणोली आणि महाबळेश्वर येथून आहेत; मात्र ते खूपच लांबचे मार्ग आहेत. त्यामुळे या गावांमधील ग्रामस्थ सध्या शिवसागर जलाशयातून चालत ये-जा करीत आहेत. जलाशयातील कोरडा भाग शोधून चालावे लागत असल्याने खूप लांबचा वळसा ग्रामस्थांना घालावा लागत आहे. तापोळ्यापासून पुढे वानवडी, सौंदरी, वाघेरा ही गावे आहेत, तर बामणोलीच्या पुढे म्हावशी, तेटली, केळघर, सोळशी, आपटी, निपाणी, कुस, रामेघर, वाकी, लाखवड, गोगवे आदी गावे आहेत. जलाशयात पाणी असताना या गावांना नौकेतून जाता येते. आता जलाशय आटल्याने पात्रातील कोरडा भाग शोधून चालत जावे लागत आहे. काही वेळा वळिवाच्या सरी कोसळतात आणि काही ठिकाणी तात्पुरते पाणी साचते. अशा वेळी काही गावांचा संपर्क दोन ते चार दिवसांसाठी तुटतो. दरम्यान, धरणात बुडालेल्या जुन्या बामणोली गावाचे अवशेष उघड दिसू लागले आहेत. (प्रतिनिधी)