शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा नगरपालिकेत सत्तासंघर्ष; स्थानिक आघाड्या अन् मनोमिलन!, शिवेंद्रसिंहराजे गटाला १० वर्षांनी नगराध्यक्षपदाची संधी

By नितीन काळेल | Updated: November 18, 2025 19:07 IST

Local Body Election: बैठकावर बैठका; निर्णय शेवटच्या दिवशीच...

नितीन काळेलसातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीचा मागील २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर संघर्ष, स्थानिक आघाड्या अन् आता मनोमिलनानंतर एकत्र लढाई असा प्रवास राहिला आहे. पण, आताच्या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने भाजपकडून नगराध्यक्षपद मिळविण्यात बाजी मारली आहे. यामुळे तब्बल १० वर्षांनी शिवेंद्रसिंहराजे गटाला संधी मिळाली.सातारा नगरपालिकेच्या मागील काही निवडणुका या स्थानिक आघाड्यातच लढल्या गेल्या. येथील सत्ता दोन्ही राजे यांच्यामध्येच राहिली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी असा हा सामना गत पंचवार्षिक निवडणुकीत होता. दोन्ही राजे हे एकाच पक्षात असले तरीही आघाड्यातूनच लढत होते.

२०१६च्या निवडणुकीत मनोमिलन तुटले अन् दोघेही स्वतंत्र आघाडीतून लढले. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाच्या माधवी कदम या नगराध्यक्षा झाल्या. कदम यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. दरम्यानच्या काळात दोन्ही राजे भाजपमध्ये गेले. आताच्या पालिका निवडणुकीत भापजकडूनच पक्ष चिन्हावर निवडणूक लढवावी, असे स्पष्ट झाल्याने दोघेही एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत.

बैठकावर बैठका; निर्णय शेवटच्या दिवशीच...सातारा पालिकेची सूत्रे ही दोन्ही राजे गटाकडेच आलटून-पालटून राहिली आहेत. आताच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उमेदवार निश्चितीसाठी अनेक बैठका घेतल्या, पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणाचा यावर शिक्कामोर्तब होत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच नगराध्यक्षपदाचे नाव जाहीर झाले. माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या नावावर मोहोर उमटली आहे.

२००६च्या निवडणुकीनंतर मनोमिलन...२००६मध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली होती. दोन्ही आघाड्याही स्वतंत्र लढल्या, पण त्यानंतर सत्तेसाठी दोघे एकत्र आले. त्यावेळी नगराध्यक्षपद वाटून घेण्यात आले. सुरुवातीला शिवेंद्रसिंहराजे गटाचे डाॅ. अच्युत गोडबोले नगराध्यक्ष झाले. त्यानंतर सात नगराध्यक्ष झाले. कधी खासदार उदयनराजे भोसले, तर कधी मंत्री शिवेंद्रसिंहराजे गटाचे हे नगराध्यक्ष होते.

२०११ च्या निवडणुकीतही एकत्र...२०११ च्या डिसेंबर महिन्यात सातारा पालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र आले होते. तसेच त्यानंतर दोन्हीही गटाचे नगराध्यक्ष झाले. २०१६ पर्यंतच्या पाच वर्षांच्या काळात चाैघांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली.

२०१६ ची निवडणूक आघाड्यावर...२०१६ च्या निवडणुकीत मनोमिलन तुटले. त्यामुळे दोन्हीही आघाड्या स्वतंत्रपणे लढल्या. यामध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लोकनियुक्त होती. यामध्ये उदयनराजे भोसले गटाच्या माधवी कदम नगराध्यक्षा झाल्या. डिसेंबर २०२१ मध्ये पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पालिकेची निवडणूक झालीच नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून पालिकेवर प्रशासक राजवट आहे.

२००६ पासून नगराध्यक्षांची कारकीर्द...

  • डाॅ. अच्युत गोडबोले १७ डिसेंबर २००६ ते १० मार्च २००८
  • निशांत पाटील १७ मार्च २००८ ते ७ मे २००९
  • नासिर शेख ८ मे २००९ ते १६ जून २००९
  • वैशाली महामुने २० जून २००९ ते ४ मार्च २०१०
  • सुजाता भोसले १५ मार्च २०१० ते २ ऑगस्ट २०१०
  • कविता देगावकर १२ ऑगस्ट २०१० ते २३ सप्टेंबर २०१०
  • सुजाता गिरीगोसावी ४ ऑक्टोबर २०१० ते २७ जानेवारी २०११
  • स्मिता घोडके ५ फेब्रुवारी २०११ ते १६ डिसेंबर २०११
  • मुक्ता लेवे २ डिसेंबर २०११ ते २१ मार्च २०१३
  • सुजाता राजेमहाडिक २ एप्रिल २०१३ ते १४ जुलै २०१४
  • सचिन सारस १४ जुलै २०१४ ते ३ ऑक्टोबर २०१५
  • विजय बडेकर १४ ऑक्टोबर २०१५ पासून...
  • माधवी कदम २२ डिसेंबर २०१६ ते २६ डिसेंबर २०२१

अमोल मोहिते, सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारीसातारा : सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला मिळणार या चर्चांना सोमवारी पूर्णविराम मिळाला. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावान शिलेदार अमोल मोहिते तर महाविकास आघाडीकडून सुवर्णा पाटील यांना ही उमेदवारी बहाल करण्यात आली. या निवडीनंतर उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Municipality Power Struggle: Local Alliances, Reunions, and a Decade's Chance!

Web Summary : Satara Municipality sees power shifts. Shivendrasinharaje's group secured the mayor post after ten years, amidst changing alliances and reunions between political factions.