शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दूध दरासाठी शिवसेना ठाकरे गटाने महामार्गावरच टॅंकर अडविले, डेअरीत घुसण्याचा दिला इशारा

By नितीन काळेल | Updated: December 19, 2023 19:19 IST

सातारा : प्रचंड दुष्काळ असताना शेतकऱ्यांना दुधाला लिटरला २७ ते २८ रुपये दर दिला जातोय. मात्र, पॅकिंगच्या दुधाला ६० ...

सातारा : प्रचंड दुष्काळ असताना शेतकऱ्यांना दुधाला लिटरला २७ ते २८ रुपये दर दिला जातोय. मात्र, पॅकिंगच्या दुधाला ६० रुपये द्यावे लागतात. भेसळयुक्त दुधालाही दुप्पट भाव आहे, असे आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने महामार्गावरच दुधाचे टॅंकर अडविले. तसेच आता दूध टॅंकर अडवले, नंतर डेअरीतही घूसू, असा इशाराही दिला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने दूध दरासाठी साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. खरीप हंगाम वाया गेला. तर रब्बीतील पिकेही पाण्याअभावी वाया जाण्याची भीती आहे. जनावरांना चाराच उपलब्ध होणार नाही. तरीही कसेबसे करुन शेतकरी पशुधन वाचवत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरला अवघा २७ ते २८ रुपये दर शासन देत आहे. याचा जमा खर्च काढला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. मात्र, पॅकिंगच्या दुधाला ६० रुपये द्यावे लागतात. तसेच भेसळयुक्त दुधालाही दुप्पट भाव मिळतोय. असे असातना जिल्ह्याचा अन्न व आैषध प्रशासन विभाग झोपला आहे का ? अशी शंका येते. शेतकऱ्यांना दुधाला योग्य दर देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनीही अधिवेशनात दुधाबद्दल भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्या घेऊन शिवसैनिकांनी साताऱ्यात बाॅंबे रेस्टाॅरंट चाैकात महामार्गावर आंदोलन केले.

शिवसैनिकांनी महामार्गावर उभे राहून दुधाचे टॅंकर अडविले. तसेच दूध दरासाठी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. यावेळी सातारा शहर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवसैनिक घटनास्थळावरुन बाजुला झाले. त्यामुळे वाहतूूक सुरळीत झाली.दरम्यान, या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे, तालुकाप्रमुख रमेश बोराटे, गणेश अहिवळे, कोरेगाव शहरप्रमुख अक्षय बर्गे, महिपती डगरे, मुगुटराव कदम आदी सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील दूध संस्थांत मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. त्यामुळे अन्न व आैषध प्रशासन विभाग झोपला आहे का ? याविषयी शंका येत आहे. यापुढे शासनानेही शेतकऱ्यांकडून योग्य दराने दूध खरेदी करावे. अन्यथा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. तसेच आता टॅंकर अडविले असलेतरी नंतर दरासाठी डेअरीमध्येही घूसू हाच आमचा इशारा आहे.- प्रताप जाधव, जिल्हाप्रमुख शिवसेना (ठाकरे गट)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmilkदूधShiv Senaशिवसेनाhighwayमहामार्ग