शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रतिष्ठानचा कऱ्हाडात निषेध मोर्चा, संभाजी भिडेंसह शेकडो धारकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 17:49 IST

Morcha SambhajiBhide Satara : हिंदू धर्मातील परंपरा व संस्कृती असलेली वारी खंडित केल्याबद्दल तसेच हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने सोमवारी शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थानच्यावतीने शासनाचा जाहीर निषेध करीत शहरात मोर्चा काढण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्त चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसिलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशिवप्रतिष्ठानचा कऱ्हाडात निषेध मोर्चाशासनाचा तिव्र शब्दात निषेध : संभाजी भिडेंसह शेकडो धारकऱ्यांचा सहभाग

कऱ्हाड : हिंदू धर्मातील परंपरा व संस्कृती असलेली वारी खंडित केल्याबद्दल तसेच हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने सोमवारी शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थानच्यावतीने शासनाचा जाहीर निषेध करीत शहरात मोर्चा काढण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्त चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसिलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.निवदेनात म्हटले आहे की, गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे होरपळून गेलेल्या राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी, कोरोना कमी होण्यासाठी सर्व जनता प्रशासनाला सहकार्य करीत आहे. प्रशासनाचे सर्व निर्बंध सचोटीने पाळत आहे. गतवर्षी आषाढी कार्तिकीच्या पायी दिंडी सोहळ्याला शासनाने बंधने घातली आणि दिंडी सोहळा रद्द केला.

एकूण परिस्थिती पाहता हिंदू बांधवांनी तो निर्णय मान्य केला. मात्र, यंदा लसीकरण हा पर्याय उपलब्ध असताना व प्रशासनाचे सर्व नियम, अटी, शर्थी पाळून काही निवडक वारकऱ्यांसह बंडातात्या कºहाडकर यांनी वारीला जाण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना प्रशासनाने स्थानबद्ध केले आहे.पंढरपुर निवडणुकीत प्रचंड संख्येने प्रचार सभा झाल्या. पुण्यामध्ये एका राजकीय कार्यालयाचे प्रचंड संख्येत उद्घाटन झाले. मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेचे प्रचंड संख्येत उद्घाटन झाले. अनेक साखर कारखान्याच्या निवडणूका व प्रचार सभा पार पडल्या. राजकीय लोकांच्या वाढदिवसाला गर्दी होत आहे. हे सर्व व प्रशासनाला चालते. मात्र, हिंदू धर्मातील परंपरा पाळल्यास कोरोना होतो, हे शहाणपण प्रशासनाला कसे सुचते. हिंदू धर्मातील परंपरा खंडित करण्याचा शासनास कोणताही अधिकार नाही.

शासनाची प्रजेसाठी जी कामे आहे ती शासन करतच नाही. मात्र, हिंदू धर्मातील प्रथा, परंपरांना अटकाव, निर्बंध घालणे हेच शासनाचे कार्य झाले आहे. त्यामुळे शासनाचा जाहीर निषेध करत असल्याचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी दिलेल्या निवदेनात म्हंटले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Morchaमोर्चाSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSatara areaसातारा परिसर