शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

By सचिन काकडे | Updated: February 26, 2025 16:12 IST

राज्यभरातील हजारो भाविक नागेश्वरचरणी लीन

सातारा : विस्तीर्ण पसरलेला कोयना जलाशय, घनदाट अरण्य, पक्ष्यांचा किलबिलाट, नागमोडी पायवाटा अन् दरदरून घाम फोडणारा सह्याद्री अशा चित्तथराक गिर्यारोहणाचा अनुभव घेत राज्यभरातील हजारो शिवभक्त बुधवारी नागेश्वराच्या चरणी लीन झाले. किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेल्या या महादेवाचे दर्शन घेतानाच भक्तांमध्ये चैतन्य तर संचारलेच, शिवाय भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगमही पाहायला मिळाला. सातारा जिल्ह्यात सर्वच सण-उत्सव मोठ्या धामधुमीत साजरे केले जातात. महाशिवरात्र हा त्यापैकी एक उत्सव. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या महादेव मंदिरांमध्ये बुधवारी महाशिवरात्र धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेले नागेश्वराचे मंदिर राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी हजारो भाविक महाशिवरात्रीला नागेश्वरचरणी नतमस्तक होत असतात. जल व जंगल सफारीचा थरारक अनुभव कोयनेच्या घनदाट अरण्यात हे मंदिर असल्याने येथे पोहोचताना भक्ती अन् शक्तीचा अक्षरश: कस लागतो. यंदादेखील हजारो भाविकांनी जल व जंगल सफारीचा थरारक अनुभव घेत नागेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. भक्तांना दर्शन घेता यावे, म्हणून तापोळा, बामणोली, मुनावळे येथून बोटींची व्यवस्था करण्यात आली होती.

वन विभागाकडून सुरक्षेची पुरेपूर काळजी आज, सकाळी ६ वाजल्यापासूनच भाविक नागेश्वराच्या दिशेने रवाना झाले. दर्शनासाठी मंदिरापासून दूर अंतरापर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांनी नागेश्वराचे दर्शन घेत परतीचा प्रवास निर्विघ्नपणे पार पाडला. वन विभागाकडून भक्तांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली होते. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने नागेश्वराचा सुळका भक्तिरसात न्हाऊन निघाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahashivratriमहाशिवरात्री