शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेवाडीचा दिल्लीत होणार गौरव : -स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:18 IST

‘स्वच्छ व सुंदर शौचालय’ स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशपातळीवर झेंडा फडकवला असून, जिल्ह्याचा दि. २४ जून रोजी दिल्ली दरबारी सन्मान होत आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर या स्पर्धेत

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींना निमंत्रण

पाचगणी : ‘स्वच्छ व सुंदर शौचालय’ स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशपातळीवर झेंडा फडकवला असून, जिल्ह्याचा दि. २४ जून रोजी दिल्ली दरबारी सन्मान होत आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर या स्पर्धेत अद्वितीय काम केलेल्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या गावकारभाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान संपूर्ण देशात झालेल्या स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम २४ जून रोजी दिल्ली येथे होत आहे. दिल्ली येथे होणाºया या सुंदर व स्वच्छ शौचालय बक्षीसवितरण कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पेयजल व स्वच्छता विभागाचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांच्याबरोबर जिल्ह्यातील शिंदेवाडी (ता. जावळी) सरपंच धनश्री शिंदे, धनगरवाडी (ता. खंडाळा) सरपंच चंद्रकांत पाचे, बनवडी (ता. कºहाड) स्वच्छतादूत शंकर खापे, स्वच्छतादूत, मठाचीवाडी (ता. फलटण) स्वच्छतादूत संदीप एखंडे, मान्याचीवाडी (ता. पाटण) आदर्श सरपंच रवींद्र माने या प्रतिनिधींना दिल्ली येथे दि. २४ जून रोजी होणाºया कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले आहे.तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत...शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या धनश्री शिंदे यांनी सरपंचपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतले असून, जलव्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता याबरोबरच तालुक्यात पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मानही या गावाने मिळविलेला आहे.

शिंदेवाडी, ता. जावळी येथील केंद्र सरकारच्या स्वच्छ व सुंदर स्पर्धेतील सहभागी असणाऱ्या शौचालयाची उत्कृष्ट रंगरंगोटी करण्यात आली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद