शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाबाहेर महेश शिंदे-जयकुमार गोरे यांची 'जादुकी झप्पी', राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:03 IST

भाजप मंत्र्यांशी दाखवलेली जवळीक भुवया उंचावणारी ठरली

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून सुरू झालेला संघर्ष आता विधिमंडळापर्यंत पोहोचला आहे. मात्र, या सर्व राजकीय धामधुमीत एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांची विधिमंडळ परिसरात झालेली गळाभेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.एकाबाजूला जिल्हा परिषदेत पक्षाचे दोन सदस्य फुटल्याने शिंदेसेना घायाळ झाली असताना, दुसरीकडे पक्षाच्याच आमदाराने भाजप मंत्र्यांशी दाखवलेली जवळीक भुवया उंचावणारी ठरली.जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांनी भाजपकडून निवडणूक लढवून अध्यक्षपद पटकावले. मात्र, या निवडीदरम्यान शिंदेसेनेचे दोन सदस्य फुटल्याने पक्षाची मोठी नाचक्की झाली. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गंभीर प्रकाराबाबत विधिमंडळात खंत व्यक्त केली आहे.असे असतानाही, महेश शिंदे यांनी या सर्वांचे खापर थेट पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर फोडत आक्रमक पवित्रा घेतला. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर, विधिमंडळातून बाहेर पडताच जयकुमार गोरे यांनी महेश शिंदे यांची चक्क गळाभेट घेऊन स्मितहास्य केले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे साताऱ्याच्या राजकारणात मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.महेश शिंदे नक्की कोणाचे?सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्याचे विधिमंडळातही तीव्र पडसाद उमटले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांच्यात कलगी तुरा पाहायला मिळाला. या सर्व घडामोडी घडत असताना आमदार महेश शिंदे हे मंत्री गोरे यांची गळाभेट घेताना दिसले. या भेटीवरुन महेश शिंदे हे शिंदेसेनेचे आमदार आहेत की भाजपचे, असा खोचक सवाल राजकीय जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahesh Shinde and Jaykumar Gore's hug sparks political buzz outside legislature.

Web Summary : A hug between Shinde's MLA Mahesh Shinde and BJP minister Jaykumar Gore outside the legislature sparked political discussion. This occurred amidst Zilla Parishad disputes, with questions arising about Shinde's political allegiance due to his closeness with Gore.