शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP: ठासून कुठलं, सगळं घासूनच आलंय; शिंदेसेनेचा उमेदवार तर केवळ एका मतानं विजयी

By प्रमोद सुकरे | Updated: February 13, 2026 18:46 IST

कराड तालुक्यातील निकालांनी उमेदवारांसह नेत्यांना फोडलाय घाम

प्रमोद सुकरेकराड : मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. नेत्यांच्या, उमेदवारांच्या विजयाच्या घोषणाही दिल्या. पण, कराडला या सगळ्या घोषणात ‘घासून नाय ठासून आलोय’ ही घोषणा कुठंच ऐकायला मिळाली नाही. कारण बहुतांश लढती अटीतटीच्या झाल्या आहेत. ‘ठासून कुठलं सगळं घासूनच आलंय’ अशी परिस्थिती आहे. एक उमेदवार तर अवघ्या १ मताने विजयी झाला आहे. त्यामुळे उमेदवारांसह नेत्यांना घाम फुटलाय बरं.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कराड तालुक्यात यंदा पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकदम अटीतटीच्या झालेल्या पाहायला मिळाल्या. प्रमुख लढत भाजप, राष्ट्रवादीतच झाली असली तरी शिंदेसेना व काँग्रेसनेही काहीसे यश मिळवले आहे. कुठे दुरंगी, तर कोठे तिरंगी, चौरंगीही लढती पाहायला मिळाल्या. परिणामी विजयाप्रत पोहोचताना उमेदवारांची दमछाक झाली. मतमोजणीच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक सुरू होती.

वाचा: ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपच्या नेत्यांनी शंभूराजेंवर टीकेची झोड उठवली, निकालानंतर 'त्यांचाच' आधार घेण्याची वेळ आलीकराड तालुका हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. येथे जिल्हा परिषदेचे १२ गट, तर पंचायत समितीचे २४ गण आहेत. हे गट व गण कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघात विखुरलेले आहेत. त्यामुळे या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेत्यांचा या निवडणुकांवर परिणाम झाल्याचे दिसले.

रेठरेवगळता कोठेच कोणाला ‘रेटता’ आलेले नाहीतालुक्यातील फक्त रेठरे जिल्हा परिषद मतदारसंघातच भाजपच्या उमेदवारांना साजेसं मताधिक्य मिळाले आहे. ते वगळता इतर एकाही मतदारसंघात कोणालाच समाधानकारक मते मिळालेली नाहीत. काहींचे बुरुज ढासळले आहेत. त्यामुळे रेठरेवगळता इतर कोठेही कोणाला रेटता आलेले नाही, अशी चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वाचा: सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच, मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पंचायत समितीतील बलाबल

  • भाजप - १३
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - ४
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - ३
  • काँग्रेस - २
  • शिंदेसेना - २

पंचायत समिती गणात काठावर पास

  • तांबवे - दिनेश कुंभार - शिंदेसेना - १ मत
  • उंब्रज - संगीता चव्हाण - राष्ट्रवादी (शरद पवार) - ३९ मते
  • पाल - प्रताप चव्हाण - राष्ट्रवादी (शरद पवार) - ९३ मते
  • येळगाव - वृषाली पाटील - राष्ट्रवादी (अजित पवार) - ९९ मते
  • वाघेरी - अनिता वेताळ - भाजप - १०५ मते

जिल्हा परिषद गटातही टक्कर

  • वारुंजी - सुनंदा पाटील - काँग्रेस - २४३
  • सुपने-ताबवे - धनंजय ताटे - भाजप - ३८०
  • कार्वे - विजया थोरात - राष्ट्रवादी (अजित पवार) - ४५३
English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Close contests, nail-biting finish, Shinde's candidate wins by one vote.

Web Summary : Satara Zilla Parishad elections saw tight races, with a Shinde Sena candidate winning by a single vote. BJP gained in Rethare, while other areas witnessed close competition. Panchayat Samiti results were also closely contested.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेKaradकराडPoliticsराजकारण