शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तिला पळवून नेताना बचावासाठी तिने रिक्षातून मारली उडी -साताऱ्यातील दिवसाढवळ्या घटना;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:32 IST

रिक्षातून घरी जात असताना एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन अपहरणाचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित युवतीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका

ठळक मुद्देरिक्षा चालकाला अटक, पोलिसांची कारवाई

सातारा : रिक्षातून घरी जात असताना एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन अपहरणाचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित युवतीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास संगमनगर परिसरात घडली.दरम्यान, या प्रकारानंतर गुन्हे प्रकटीकरण आणि सातारा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळ्या. संतोष ऊर्फ नऱ्या रतन झोंबाडे (वय २९, रा. प्रतापसिंहनगर, पाण्याच्या टाकीजवळ खेड, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बसस्थानकाशेजारी उभ्या असलेल्या एका रिक्षामध्ये संबंधित पीडित युवती संगमनगर येथे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसली. तिच्यासोबत अन्य प्रवासीही रिक्षामध्ये बसले होते. बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात रिक्षा गेल्यानंतर रिक्षातील काही प्रवासी आपापल्या थांब्यावर खाली उतरले. त्यानंतर संबंधित युवती एकटीच रिक्षामध्ये राहिली. संगमनगर स्टॉप आल्यानंतर तिने रिक्षा चालक झोंबाडे याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, त्याने न ऐकल्यासारखे केले. त्यामुळे त्या युवतीने पुन्हा त्याला सांगितले; परंतु तरीही त्याने न ऐकताच रिक्षा भरधाव नेण्यास सुरुवात केली. संबंधित युवतीच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिने कसलाही मागचा पुढचा विचार न करता भरधाव रिक्षामधून थेट खाली उडी मारली. यामध्ये ती युवती जखमीही झाली. अशा अवस्थेत तिने माहुली दूरक्षेत्र येथे जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणे, रिक्षा तपासणे, माहितगार आरोपींचा शोध घेणे आदी सूचना पोलिसांच्या पथकाला दिल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून सुमारे २०० रिक्षा तपासल्या. त्यानंतर सहायक पोलीस फौजदार विष्णू खुडे यांना संबंधित रिक्षा चालकाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाच तासांच्या आत रिक्षा चालक संतोष झोंबाडे याच्या प्रतापसिंहनगरातून मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक एस. सी. पोरे, सहायक पोलीस निरीक्षक बी. जे. ढेकळे, सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. पवार, विष्णू खुडे यांचा सहभाग होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर