शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी, उपचारानंतर वन कर्मचाऱ्यांनी शेखरू सोडले नैसर्गिक अधिवासात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 10:44 IST

महाबळेश्वर: विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. या जखमी शेखरुवर उपचार करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ...

महाबळेश्वर: विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. या जखमी शेखरुवर उपचार करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचविले व नंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडुन दिले. 

महाबळेश्वर हे घनदाट सदाहरीत जंगलांनी व्यापलेले आहे. या जंगलात महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळख असलेल्या शेखरूंची संख्या मोठया प्रमाणावर वाढलेली आढळते. मखमली तांबुस रंग आणि झुपकेदार शेपटी असलेला राज्य प्राणी शेखरू हा झाडावर राहणारा प्राणी आहे. झाडावरील फळे खावून तो जगतो. 

ग्लॅनओगल धरणाजवळ असलेल्या एका हॉटेल परीसरात हे शेखरू एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतानाच झाडाखाली असलेल्या विजेच्या ताराला शेखरूची शेपटी लागली. यावेळी विजेचा झटका बसून हे शेखरू हे जमिनीवर कोसळले ते बराच वेळ बेशुध्द अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडुन होते. 

शुभम फळणे यांना हे जखमी शेखरु निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत वन विभागाचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांना कळविले. फळणे यांनी हे जखमी शेखरू वन विभागाच्या कायार्लयात वन कर्मचारी यांच्या स्वाधिन केले. पशु वैदयकिय अधिकारी यांनी जखमी शेखरूवर उपचार केले.आज शेखरूची तब्बेत बरी झालेली दिसली तेव्हा वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी शेखरूस त्याच्या नैसगिर्क अधिवासात सोडण्याचे आदेश दिले. वनक्षेत्रपाल यांच्या सुचने नुसार वनरक्षक लहु राउत व इतर कर्मचाऱ्यांनी शेखरूस हिरडा विश्रामगृहा जवळील जंगलात सोडुन दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर