शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 08:53 IST

लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टाकी केली.

Ladaki Baheen Yojana : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या महत्त्वांकाक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महायुतीच्या नेते विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत. या कार्यक्रमातून विरोधकांवर जोरदार निशाणा देखील साधला जात आहे. अशातच भाजपचे साताऱ्याती माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलंय, असं म्हणत जयकुमार गोरेंनीसुप्रिया सुळेंना सुद्धा लक्ष्य केलं.

वडूज येथे भाजपच्या वतीने लाडकी बहीण सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.  आमच्या सरकारने महिलांना  दीड हजार देण्याचा निर्णय आमलात आणल्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागल्याचे  जयकुमार गोरे म्हणाले. तसेच सुप्रिया सुळेंना फुकटचे खायची सवय लागली असल्याचे गोरेंनी म्हटलं.

"विरोधक सांगतात ही योजना निवडणुकीसाठी काढली आहे. ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार असल्याचे विरोधक सांगतात.  मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या पाच वर्षांसाठी ही योजना सुरु केलेली आहे. कुणी कितीही सांगितले तरी त्यांच्या नादी लागू नका. कारण हे सावत्र भाऊ आहेत. सावत्र भाऊ सांगतात बहि‍णींना फुकटची खायची सवय लावू नका. आमच्या बहि‍णींना त्यांचा भाऊ हक्काचे देत आहे. कुणी कुणाच्या खिशातून देत नाही. आमच्या बहिणीला १५०० रुपये दिले तर शरद पवारांच्या पोटात दुखायचे कारण काय आहे. मग यांच्या पोटात का दुखत आहे," अशी जहरी टीका जयकुमार गोरे यांनी केली.

"सगळं फुटक मिळत असल्याचे ते सांगत आहेत. सुप्रिया सुळे सांगतात बहिणांना फुकटची सवय का लावता हे चांगले नाही. सुप्रिया सुळेंना फुकटची खायची सवय आहे," असेही जयकुमार गोरे म्हणाले.

"भाजपप्रणित केंद्र आणि महायुतीच्या राज्य सरकारने महिला, माता, भगिनींसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या सर्व योजनांची अंमलबजावणी सुरू असून लाखो महिलांना त्याचा लाभही मिळत आहेत. महाविकास आघाडीचे शरद पवार, नाना पटोले, उध्दव ठाकरे, वड्डेटीवार हे सावत्र भाऊ या योजनांची खिल्ली उडवत आहेत. आजच्या कार्यक्रमाला झालेली महिलांची तुडुंब गर्दी म्हणजे विरोधकांना चपराक आहे," असं जयकुमार गोरेंनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाJaykumar Goreजयकुमार गोरेSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे