शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला विकासात पुढे घेऊन जाण्यासाठी युवा शक्तीची गरज- शरद पवार

By दीपक शिंदे | Updated: July 3, 2023 14:05 IST

अपप्रवृत्तीला मदत करणाऱ्यांना सहा महिन्यात जागा दाखवू!

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: देशातील सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार काढून घेणे आणि जातीय दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. राज्यात देखील अशाच प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना पुढील सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. तसेच महाराष्ट्राला पुन्हा प्रगती कडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असून त्याला युवाशक्तीचा हातभार लागणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्यांनी पक्षाची नवी भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच आगामी कालावधीमध्ये कोणत्या पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, मानसिंगराव देशमुख, अरुण लाड, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, रोहित पाटील आणि प्रतीक पाटील उपस्थित होते. शरद पवार म्हणाले,  जात, धर्म आणि पंथ या माध्यमातून माणसांमध्ये संघर्ष कसा वाढत जाईल, यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग तयार होतो आहे. शाहूंचे कोल्हापूर असेल नांदेड, सांगोला, अकोला या ठिकाणी लोकांमध्ये वैरभावना निर्माण करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातूनच जातीय दंगे झाले.समाजविघातक प्रवृत्ती या उभ्या  राहत असताना त्यांना रोखण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस हे काम करत आहे. मात्र त्यालाही अडथळा आणण्याचा प्रयत्न या शक्तीकडून होत आहे.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून सरकार एकत्रितपणे चालवण्याचं काम केलं. मात्र हे सरकार देखील पाडून टाकण्याचं काम या विघातक शक्तिने केले. देशात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून मध्य प्रदेश मध्ये कमलनाथ यांचे सरकार देखील अशाच पद्धतीने पाडण्यात आले.  देशात दिल्ली, पंजाब, उत्तराखंड या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे. सध्या संकटाचा काळ आहे, पण यातूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या प्रवृत्तीला थांबविले पाहिजे. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा आहे. लोकशाहीत काम करणाऱ्या कामगारांचा आहे. या ठिकाणी जातीयवादी विचारधारा कधीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार नाही. यासाठी ही नवीन पिढी जातीयवाद्यांना गाडण्याचे काम करेल. दुर्दैवाने आपले काही सहकारी या जातीवादांसोबत जात आहेत. मात्र, लवकरच त्यांना त्यांची जागा देखील कळेल. यासाठी सर्व सामाजिक शक्ती मजबूत करून आपण लढा उभारला पाहिजे. सर्वांच्या हिताचे कष्टकऱ्यांचे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे राज्य निर्माण करण्याचे काम पुढच्या काळामध्ये होणं आवश्यक असल्याचेही  पवार म्हणाले.

आता फक्त माझाच आवाज..

प्रीतीसंगमावरती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी शरद पवारांनी सर्वांना शांत करत, शांत बसा, कोणी बोलू नका. आता फक्त माझाच आवाज असे बोलल्याने सर्वत्र शांतता पसरली. मात्र त्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे हे देखील सर्वांना कळले.

तुमच्याकडे बेंदूर आमच्याकडे गुरुपौर्णिमा

यशवंतराव चव्हाण हे तुमचे आमचे सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जनमत तयार करण्याचे काम पुढच्या काळात करायचे आहे. ते त्यांचा आशीर्वाद घेऊनच करणार आहोत. यासाठी त्यांना वंदन करून महाराष्ट्राच्या नवीन कामाला सुरुवात करत असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तुमच्याकडे बेंदूर असला तरी आमची गुरुपौर्णिमा आहे असे सांगत त्यांनी उपस्थिताना नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणी बाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षKaradकराडNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार