शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

शाहूपुरीत बालकुमार साहित्य संमेलन

By admin | Updated: December 1, 2015 00:19 IST

विद्यार्थीच असणार अध्यक्ष : ४, ५ डिसेंबर रोजी आयोजन

शाहूपुरी : शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ४ व ५ डिसेंबर रोजी शाहूपुरीतील समाजमंदिरात बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या हस्ते होणार आहे. राजेश लोटेकर हा विद्यार्थी संमेलनाध्यक्ष असणार आहे.याबाबतची माहिती राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघाचे अध्यक्ष भारत भोसले यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांना मराठी भाषा, साहित्यसंपदा, साहित्यिकांची ओळख व्हावी, त्यांच्यात भाषेची आवड जोपासली जावी, यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, संमेलनाचे अध्यक्ष राजेश लोटेकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर लगेच संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या ‘सह्याद्री’ या हस्तलिखिताचे प्रकाशन केले जाणार आहे. सव्वाअकरा वाजता प्रा. श्रीधर साळुंखे यांचे ‘माझी मराठी मायबोली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी एक वाजता मुलांनी वाचलेल्या पुस्तकांवर आधारित अमृतमंथन हा कार्यक्रम प्रमोदिनी मंडपे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तीन वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लोकगीतांचा कार्यक्रम विद्यार्थी सादर करणार आहेत.शनिवार, दि. ५ रोजी सकाळी ८ वाजता नवोदित कवींचे काव्य संमेलन डॉ. राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी कवी यशेंद्र क्षीरसागर, वसंत शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवोदितांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)