शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस

By नितीन काळेल | Updated: June 15, 2023 12:30 IST

माण तालुक्यात तर भीषणता अधिक

सातारा : मान्सूनचा पाऊस लांबला.. उन्हाळी पाऊसही कमी झाले.. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता वाढू लागली आहे. माण तालुक्यात तर भीषणता अधिक आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठीही लोक पायपीट करत आहेत. त्यातच टॅंकरने पाणीपुरवठा होत असलातरी अपुरा आहे. तर टॅंकरची वाट पाहण्यामुळे पै-पाहुणेही दुरावले असून पशुधनाची तर पाण्याअभावी परवड सुरू असल्याचे वास्तव समारे येत आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांत टंचाई जाणवली नव्हती. याला कारण जलसंधारणाची कामे. त्यातच पाऊसही वेळेत सुरु व्हायचा. वळीवही बरसून धरणीमाता तृप्त करायचा. पण, यंदा हवामान विभागाचा अंदाज खरा होताना दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणार असून सध्यातर मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत सतत वाढ होत चालली आहे. जून मध्यावर आलातरी लोकांची तहान भागविण्यासाठी टॅंकर धुरळा उडवत पळत आहे.सध्यस्थितीत जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा सोडले तर ९ तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये माणमध्ये तर उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणीटंचाईची दाहकता लोकांना गलबलून सोडत आहे. यामुळे प्रशासन टॅंकर सुरू करत असलेतरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे लोकांना विकतही पाणी घेण्याची वेळ आली आहे.

माणमध्ये टंचाईची स्थिती भयानाक आहे. २८ गावे आणि १६१ वाड्यांना टॅंकरचाच आधार आहे. तालुक्याच्या चाैफेर भागात टंचाई आहे. सध्या २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असलातरी यापुढे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. या टंचाईग्रस्त गावांत माणसी आणि जनावरांच्या संख्येप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. भाटकी गावातही गेल्या १५ दिवसांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. पण, पाणी कमी पडत आहे. त्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.या गावातील लोकांना पाणी देताना सार्वजनिक विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले जाते. त्यानंतर नळाद्वारे पाणी मिळते. पण, हे पाणी चार दिवसांतून एकदा येते. तर वाड्यांसाठी टॅंकर जागेवर जात असलातरी दिवसभर लोकांना वाट पहावी लागते. त्यामुळे कधी टॅंकर येतोय याची वाट पाहण्याने पाहुणे तसेच एखाद्या कामासाठीही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. भाटकीप्रमाणे माण तालुक्यातील अनेक गावांची स्थिती अशी झाली आहे. यासाठी प्रशासनाने वेगाने उपाययोजना राबवाव्यात अशीच मागणी होत आहे.

सध्या माणसांना आणि जनावरांसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण, हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जनावरांनाही चारा सोलापूर जिल्ह्यातून आणवा लागतोय. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या लवकर सुरू कराव्यात अशी आमची विनंती आहे. - दत्तात्रय शिर्के, सामाजिक कार्यकर्ते भाटकी, ता. माण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी