शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खंबाटकीतील एस वळणावर पुन्हा भीषण अपघात; दोनजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:10 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्या परिसरातील एस वळणावर अपघातांची मालिका संपता संपेनासी झाली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी कंटेनर उलटी होऊन दोनजण जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही हे वळण कायमचे काढून टाकण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे या वळणावर अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.

ठळक मुद्देखंबाटकीतील एस वळणावर पुन्हा भीषण अपघात; दोनजण जागीच ठार १२ जखमी;अपघाताची मालिका सुरूच ; प्रशासनाचे दुर्लक्ष

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्या परिसरातील एस वळणावर अपघातांची मालिका संपता संपेनासी झाली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी कंटेनर उलटी होऊन दोनजण जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही हे वळण कायमचे काढून टाकण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे या वळणावर अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून महामागार्ने बोअर खोदकाम करणारा कंटेनर ( एमएच ११ एएल ४४६६) हा बोगदा ओलांडून पुढे आला. तीव्र उतारावरील एस वळणावर ट्रकचा गियर बॉक्स तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर एस वळणावरील पूलाच्या कठड्याला धडकून कंटेनर उलटला. या ट्रकमधून १४ कामगार प्रवास करीत होते. अपघातात दोन कामगार जागीच ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटली नाही.

 कालीमत्तू ( वय ३२ ) , प्रमोद ( वय ३६ ) , विठ्ठल भोगम ( वय २५ ) , मुस्तफा , शैलदुराई , राजा स्वामी , निलू , केसू सिंग ( वय ३० ) , मुन्ना स्वामी , व्यंकटेशन लक्ष्मण , बाबूलाल , जंगमू सलाम ( वय २५ ) हे १२ कामगार जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस व महामार्ग पोलिसांनी घाटात धाव घेऊन जखमी कामगारांना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ट्रकचा चक्काचूर अन् जखमींच्या किंकाळ्या ..

घाटातील एस वळणावर ट्रक संरक्षक कठड्याला अतिशय वेगाने धडकला. त्याची तीव्रता एवढी होती की ट्रकचा चक्काचूर झाला. ट्रकचे सर्व भाग तुटून महामार्गावर विखुरले तर काही भाग कठड्यावरुन खाली फेकले गेले. उगवत्या सूर्यालाच अपघात घडल्याने घाटात जखमींच्या किंकाळयांनी परिसर भयभीत झाला होता. साहित्याच्या गराड्यातून पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. अपघाताची मालिका सुरूच ...खंबाटकीतील एस वळणावर बऱ्याचदा चालकांच्या हे एस वळण लक्षात येत नाही. पुढे अचानक एस आकाराचे वळण असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. मागील महिन्यात या ठिकाणी सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला एक पाय गमवावा लागला.

या वळणावर प्रवाशांचा मृत्यूचा आकडा शंभरीवर पोहोचला आहे. मात्र या वळणावर अद्याप उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नवीन बोगदा केव्हा होणार आणि या वळणाचे काष्ट शुक्ल कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर