वडूजच्या मंडईतील सात विक्रेते कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:28+5:302021-03-07T04:36:28+5:30

वडूज : जिल्ह्यातील बहुतांश भागात कोरोनाचा शिरकाव पुन्हा वाढत असतानाच, वडूजच्या भाजी मंडईतील सात विक्रेते कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे ...

Seven vendors in Vadodara's Mandai are coroned | वडूजच्या मंडईतील सात विक्रेते कोरोनाबाधित

वडूजच्या मंडईतील सात विक्रेते कोरोनाबाधित

googlenewsNext

वडूज : जिल्ह्यातील बहुतांश भागात कोरोनाचा शिरकाव पुन्हा वाढत असतानाच, वडूजच्या भाजी मंडईतील सात विक्रेते कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.

वडूज शहरात ३५ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, यासाठी नगरपंचायत व आरोग्य विभाग युध्दपातळीवर कार्यरत आहे.

तालुक्यातील विविध गावांत अखेर सुमारे ४,४८३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. यापैकी ४,१३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुळे १६४ जणांचा मृत्यू झाला आहे. १८१ रुग्णांपैकी साताऱ्यातील जम्बो कोरोना सेंटर, मायणी व पुसेगाव यासह काहीजण घरी थांबूनच उपचार घेत आहेत. त्यात वडूजमध्ये ३५ जणे बाधित झाले आहेत.

नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या आव्हानाला सामोरे जात येथील व्यापाऱ्यांनी तपासणी सुरू केल्या आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. अशा पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबत काळजी घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपंचायत प्रशासनाकडून प्रत्येक दुकानदार, भाजीपाला विक्रेते, वाहतूक व्यावसायिक असे मोठा जनसंपर्क असलेले गट संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरविण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यांची सातत्याने तपासणी होण्यासाठी युध्दपातळीवर कार्य सुरू केले आहे.

माण तालुक्यातील दहीवडी येथील बाधितांची संख्या पाहता, खटाव तालुक्यातील शेजारची गावांमध्ये आरोग्य विभागाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. प्रांताधिकारी कार्यालय दहीवडी येथे असल्याने खटाव तालुक्यातून नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी खटाव तालुक्यातील अनेकांना दहीवडी येथे जावे लागते. याप्रसंगी संबंधितांनी योग्य ती काळजी घ्यावी, यासाठी पोलीस प्रशासन ही जागरूक आहे.

योग्य काळजी घेणे गरजेचे

कोरोनाबाबतीत नागरिक योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी गर्दी टाळणे, मास्कचा नेहमी वापर करणे, सॅनिटायझर वापरणे या गोष्टींची पुन्हा काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन होणे गरजेचे आहे. कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांनी केले आहे.

तालुक्यातील रुग्णसंख्या

जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या अहवालानुसार खटाव तालुक्यातील गावनिहाय वाढलेले रुग्ण असे : खटाव ९, कलेढोण १, पाचवड १, पुसेगाव ३, वडूज ९, हिरवेवाडी ७, पळशी २, गाडेवाडी १, सिद्धेश्वर कुरोली ३, ललगुण १, जायगाव १.

फोटो ०६वडूज मंडई

वडूजमधील बाजार पटांगण येथील मंडईत सात विक्रेते बाधित निघाल्याने बैठक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. (छाया : शेखर जाधव)

Web Title: Seven vendors in Vadodara's Mandai are coroned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.