शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकतीस डिसेंबरसाठी पोलिसांच्या सात टीम : ६० पोलिसांची जादा कुमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:00 IST

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहर व परिसरात पार्ट्या झडत असतात. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांच्या सात टीम तयार करण्यात

ठळक मुद्देफिरते पथक राहणार तैनात

सातारा : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहर व परिसरात पार्ट्या झडत असतात. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांच्या सात टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये ६० पोलीस अधिकारी व कर्मचारी असणार आहेत.

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहने तपासून सोडण्यात येणार आहेत. लिंबखिंड, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप, बोगदा (समर्थ मंदिर), मोळाचा ओढा या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केंद्रे उभारली आहेत. शाहूपुरी, सातारा तालुका आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ३१ डिसेंबरला होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.

वेगवेगळ्या सात टीम तयार करण्यात आल्या असून, यामध्ये साध्या वेशातील पोलिसांचा भरणा जास्त आहे. हे पोलीस रात्री निर्जनस्थळी होणाºया पार्ट्यांवर अंकुश राहावा, यासाठी पाळत ठेवून असणार आहेत. तर या पथकातील काहीजण वाहनांची तपासणी करणार आहेत. मद्यप्राशन करून गाडी चालविणाºयांवरही जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साह्याने विशेषत: वाहन चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. मद्यप्राशन करणाºयांवर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.

उत्साहाच्या भरात छेडछाडीचेही प्रकार घडत असतात. त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशातील महिला पोलिसांनाही या टीममध्ये सहभागी केले आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच नाकाबंदी सुरू करण्यात येणार आहे. विशेषत: वाहनांमधून मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा आणला जातो. त्यामुळे प्रत्येक वाहनांची अगदी बारकाईने तपासणी केली जाणार आहे. तीन वर्षांपूर्वी ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी गेलेल्या युवकाचा महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये खून झाला होता. किरकोळ बाचाबाचीतून ही घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून हॉटेल चालक आणि मालकांना पोलिसांनी खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणाºया मालकांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत.कास पठारावर विशेष लक्षकास पठारावर अनेकजण पार्टी करण्यासाठी जात असतात. बाटल्यांचा खच आणि लाकडे जाळून प्रदूषण केले जात असल्यामुळे या जागतिक वारसा स्थळावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कास पठारावर जाणारे वाहने तपासून सोडण्यात येणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस