शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना दिलासा!, साताऱ्यात सेतू कार्यालय शनिवारी-रविवारीही सुरू राहणार

By दीपक देशमुख | Updated: June 26, 2024 18:42 IST

सातारा तहसीलदारांच्या सूचना 

सातारा : शैक्षिणक वा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सवलती, तसेच अन्य सुविधा मिळविण्यासाठी अनेक प्रकारचे दाखले प्रवेश अर्जावेळी जोडावे लागतात. त्यामुळे सेतू कार्यालयात पालकांची रांग लागलेली असते. दाखल्याअभावी कोणाची गैरसोय होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्याशी संवाद साधून तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सातारा तहसील कार्यालयातील सेतू कार्यालय सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.सातारा येथील सेतूमधून शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे उत्पन्न, रहिवासी, अर्थिकदृष्ट्या दुर्बल, शेतकरी दाखला, डोंगरी दाखला, अल्पभूधारक, जातीचे दाखले असे विविध प्रकारचे दाखले दिले जातात. सध्या जून महिन्यात दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांची दाखल्यांसाठी धांदल उडाली आहे. वेळेवर दाखला जमा केला नाही, तर प्रवेश, तसेच सवलती रद्द होऊ शकतात. यामुळे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे दाखल्यासाठी हातातील कामे सोडून पालकांना धावपळ करावी लागते. हे टाळण्यासाठी, तसेच प्रवेशप्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सातारा तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयांत जुलै महिनाअखेर शनिवारीही सेतू कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी अर्ज करणाऱ्यांचे दाखले रविवारी वितरित करण्यात येणार आहेत.

सहा महिन्यात ३३,९२३ दाखले वितरितसातारा सेतू कार्यालयातून जानेवारी २०२४ ते २६ जून २०२४ अखेर विविध प्रकारचे तब्बल ३२ हजार ९२३ एवढे दाखले दिले गेले आहेत.

हेलपाटे, विलंब टळणारअनेकदा दाखले मिळविण्यासाठी सेतू कार्यालयात नागरिक मोठ्या संख्येने येतात. या दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळणी करावी लागते. यासाठी वेळ लागतो. कागदपत्रांची जुळणी शुक्रवारी उशिरापर्यंत झाल्यास, आता सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. शनिवारीही सेतू कार्यालय खुले राहणार असून, या दाखल्यांचे वितरण रविवारी होणार आहे. यामुळे विलंबही होणार नाही.

शाळेचे निकाल जाहीर झाले असून प्रवेश शैक्षणिक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी नागरिक सेतू कार्यालयात येत आहेत. यावेळी संगणक प्रणालीतील अडचणी, खंडित होणारा विद्युत पुरवठा, विविध प्रकारच्या शैक्षणिक कारणासाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यासाठी वाढलेली मागणी या अडचणींमुळे दाखल्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शनिवारी सेतू कार्यालय सुरू राहणार आहे, तसेच रविवारी या दाखल्यांचे वितरण होणार आहे. जुलैअखेरपर्यंत ही सुविधा देण्यात येणार आहे. - नागेश गायकवाड, तहसीलदार, सातारा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर