मसूर: ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षामुळे कोरोना रुग्णसंख्येला निश्चितच ब्रेक लागेल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी व्यक्त केला.
निगडी (ता. कऱ्हाड) येथे शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्राथमिक शाळेमध्ये सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, मसूर पोलीस दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव, मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, निगडीच्या सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच विनायक देटके, सोसायटीचे अध्यक्ष संतोष घोलप तसेच निगडीचे ग्रामसेवक, तलाठी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व निगडी ग्रामस्थ उपस्थित होते.
०४मसूर..
निगडी (ता. कऱ्हाड) येथे विलगीकरणाच्या प्रारंभप्रसंगी मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे, प्रवीण जाधव, डॉ. रमेश लोखंडे आदी उपस्थित होते.