खंडाळा : कोरोनासारख्या विषाणूने खंडाळा तालुक्यातील अंदोरी गावात थैमान घातले आहे. कोरानाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे. कोरोनाच्या विळख्यातून गावाला बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती विविध उपाययोजना करीत आहे. गावासाठी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी वर्गणी गोळा केली आहे. त्यातूनच रुग्णांना आवश्यक बाबी पुरविल्या जात आहेत. अंदोरीकरांचा हा उपक्रम इतरांना दिशादर्शक ठरत आहे.
खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आणखी मजबूत करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून आपल्या गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने अंदोरी ग्रामपंचायत व व्यवस्थापन समितीने प्राथमिक शाळेत स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी अल्प लक्षणे असलेल्या रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या कक्षातील सर्व रुग्णांना गावचे सुपुत्र बाळासोा वाघमारे हे नाष्टा व दोन वेळचे जेवण देत आहेत. मात्र, त्यांना सहकार्य करीत या अन्नदानासाठी डॉ. नानासोा हाडंबर, नानासोा ननावरे, सरपंच प्रदीप होळकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासोा होवाळ, किसन ननावरे, दत्तात्रय धायगुडे, संजय जाधव, सोपान धायगुडे, नवनाथ ससाणे, तानाजी ठोंबरे, ईश्वर जाधव, अशोक होवाळ, शांताराम होवाळ या दानशूर व्यक्तींनी वर्गणी जमा करून ५१ हजारांची मदत दिली आहे. त्यामुळे या कक्षाच्या व्यवस्थापनेला हातभार लागणार आहे. हा स्तुत्य उपक्रम इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. त्याचबरोबर गावातील संपर्क रुग्ण शोधण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांची तपासणी करून रुग्णांचा शोध घेणे सोपे जात आहे. लोकांच्या आरोग्यासाठी मैदानात उतरून उचललेले पाऊल निश्चितच आदर्शवत आहे.
कोट...
गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याला आळा घालण्यासाठी गावपातळीवर सर्व प्रयत्न सुरू आहेत. विलगीकरण कक्षाला आणखी मदत मिळणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण मोहीम जास्त प्रमाणात राबविली जावी. शासकीय यंत्रणेने अधिक लक्ष दिल्यास या प्रयत्नांना यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, हीच अपेक्षा आहे.
- प्रदीप होळकर, सरपंच
26खंडाळा
अंदोरी (ता. खंडाळा) विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी वर्गणी गोळा केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : कोरोनासारख्या विषाणूने खंडाळा तालुक्यातील अंदोरी गावात थैमान घातले आहे. कोरानाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे. कोरोनाच्या विळख्यातून गावाला बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती विविध उपाययोजना करीत आहे. गावासाठी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी वर्गणी गोळा केली आहे. त्यातूनच रुग्णांना आवश्यक बाबी पुरविल्या जात आहेत. अंदोरीकरांचा हा उपक्रम इतरांना दिशादर्शक ठरत आहे.
खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आणखी मजबूत करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून आपल्या गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने अंदोरी ग्रामपंचायत व व्यवस्थापन समितीने प्राथमिक शाळेत स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी अल्प लक्षणे असलेले रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या कक्षातील सर्व रुग्णांना गावचे सुपुत्र बाळासोा वाघमारे हे नाष्टा व दोन वेळचे जेवण देत आहेत. त्यांना सहकार्य करीत या अन्नदानासाठी डॉ. नानासोा हाडंबर, नानासोा ननावरे, सरपंच प्रदीप होळकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासोा होवाळ, किसन ननावरे, दत्तात्रय धायगुडे, संजय जाधव, सोपान धायगुडे, नवनाथ ससाणे, तानाजी ठोंबरे, ईश्वर जाधव, अशोक होवाळ, शांताराम होवाळ या दानशूर व्यक्तींनी वर्गणी जमा करून ५१ हजारांची मदत दिली आहे. त्यामुळे या कक्षाच्या व्यवस्थापनेला हातभार लागणार आहे. हा स्तुत्य उपक्रम इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. त्याचबरोबर गावातील संपर्क रुग्ण शोधण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांची तपासणी करून रुग्णांचा शोध घेणे सोपे जात आहे. लोकांच्या आरोग्यासाठी मैदानात उतरून उचललेले पाऊल निश्चितच आदर्शवत आहे.
कोट...
गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याला आळा घालण्यासाठी गावपातळीवर सर्व प्रयत्न सुरू आहेत. विलगीकरण कक्षाला आणखी मदत मिळणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण मोहीम जास्त प्रमाणात राबविली जावी. शासकीय यंत्रणेने अधिक लक्ष दिल्यास या प्रयत्नांना यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे.
- प्रदीप होळकर, सरपंच
26खंडाळा
अंदोरी (ता. खंडाळा) विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी वर्गणी गोळा केली आहे.