शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने वार करून तिघांना जखमी करणाऱ्या आरोपीला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 15:35 IST

पत्नीच्या औषधोपचारासाठी एक हजार रुपये न दिल्याने तिघांवर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी व्ही. एस. मडके यांनी राजू दीपक साळुंखे (वय ४५, रा. झेंडा चौक, करंजे पेठ, सातारा) याला दोन वर्षे ५६ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देचाकूने वार करून तिघांना जखमी करणाऱ्या आरोपीला शिक्षाएक हजारासाठी कृत्य: न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल

सातारा : पत्नीच्या औषधोपचारासाठी एक हजार रुपये न दिल्याने तिघांवर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी व्ही. एस. मडके यांनी राजू दीपक साळुंखे (वय ४५, रा. झेंडा चौक, करंजे पेठ, सातारा) याला दोन वर्षे ५६ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, रहिनाथ श्रीधर लोणकर (वय ३५,रा. बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा) यांच्याकडे आरोपी राजू साळुंखे याने १ मार्च २०१७ रोजी पत्नीच्या औषधोपचारासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे देण्यास लोणकर यांनी नकार देताच चिडलेल्या राजू साळुंखे याने त्यांच्यावर चाकूने वार केले.

हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या अंजना शंकर कदम (रा. करंजे पेठ, सातारा), शालन गोविंद लिंगाळे (रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) यांच्या हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. या प्रकाराची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी राजू साळुंखे याला अटक केली होती.पोलीस उपनिरीक्षक पी. बी. कदम यांनी पोलीस नाईक लेंभे, पोलीस नाईक घोडके, हवालदार कुमठेकर यांच्या मदतीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने राजू साळुंखे याला दोन वर्षे ५६ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पा जाधव यांनी काम पाहिले. पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे सहायक फौजदार शशिकांत भोसले यांनी त्यांना सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर