Self-Proposed Doctor on social media: - Vidyasagar Rao | सोशल मीडियावर स्वयंघोषित डॉक्टरांचा सुळसुळाट-- : सी. विद्यासागर राव
सोशल मीडियावर स्वयंघोषित डॉक्टरांचा सुळसुळाट-- : सी. विद्यासागर राव

ठळक मुद्देकृष्णा विद्यापीठाचा आठवा दीक्षांत सोहळा उत्साहात; ५५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

कºहाड : ‘काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे स्वयंघोषित डॉक्टर्स समाजमाध्यमांतून आरोग्यविषयक सल्ले व चुकीची माहिती पसरवत आहेत. या संदेशांची कोणतीही खातरजमा न करता अनेक रुग्ण या सल्ल्यांची अंमलबजावणी करत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. सोशल मीडियावरील अशा स्वयंघोषित डॉक्टर्सचा सुळसुळाट थांबविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी या सोहळ्यात मुंबई येथील राजभवनातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कुलगुरू डॉ. नीलिमा मलिक, डॉ. प्रवीण शिंगारे, विनायक भोसले, मनीषा मेघे, डॉ. स्वप्ना शेडगे, दिलीप पाटील, पी. डी. जॉन, डॉ. आर. के. गावकर, डॉ. अरुण रिसबुड, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. एम. व्ही. घोरपडे उपस्थित होते.
या सोहळ्यात विद्यापीठातील ५५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १४ जणांना कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, ‘दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या दूरदृष्टीतून आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाने कृष्णा अभिमत विद्यापीठ उत्तुंग शिखरावर पोहोचले आहे. सोहळ्याला मदनराव मोहिते, उत्तरा भोसले, गौरवी भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. वैशाली मोहिते, डॉ. एस. सी. काळे उपस्थित होत्या.


पवनराज भोसले चार पदकांचा मानकरी
एमबीबीएस अधिविभागातील पवनराव नितीन भोसले या विद्यार्थ्याने सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे दिवंगत गोविंद विनायक अयाचित स्मृती सुवर्णपदक, यूएसव्ही पदक, डॉ. आर. एस. कोप स्मृती पुरस्कार, डॉ. व्ही. के. किर्लोस्कर पुरस्कार अशी एकूण चार पदके पटकाविली. विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे दिवंगत जयवंतराव भोसले सुवर्णपदक, तसेच बीडीएस अभ्यासक्रमाच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जयमाला भोसले सुवर्णपदक पायल संदीप चौधरी या विद्यार्थिनीने पटकाविले. तसेच राहुल रंजन, प्रशंसा पवार, प्रियांका चावरे, डॉ. वरुण त्यागी, मुग्धा कदम, डॉ. प्रतीक आजगेकर, डॉ. पराग तांबेरी, प्राजक्ता दाते, डॉ. वरुण गायतोंडे, डॉ. मलिक मेहता, ईशा, शेखर भोर, सौरीश होता यांनीही विविध पारिताषिके पटकाविली.


कºहाड येथे कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात सर्वाधिक पदके पटकाविणाऱ्या पवनराज भोसले या विद्यार्थ्याचा गौरव कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शेखर चरेगावकर, विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.


Web Title: Self-Proposed Doctor on social media: - Vidyasagar Rao
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.