शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

हलाखीची परिस्थिती, एका खोलीत संपुर्ण कुटूंब; चरेगावच्या शिवम विसापुरेची पोलिस उपअधीक्षकपदी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 4:30 PM

स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात शिवम नायब तहसीलदार बनला

अजय जाधवउंब्रज: फिनिक्स भरारी हा शब्द प्रयोग आपण नेहमी वाचतो, ऐकतो. पण हा फिनिक्स भरारी शब्द तंतोतंत लागू होतो तो कराड तालुक्यातील चरेगाव येथील २६ वर्षीय शिवम विसापूरे याने मिळवलेला पोलिस उपअधीक्षक या पदाच्या निवडीच्या यशोगाथेतूनच.कराड तालुक्यातील चरेगाव येथील विसापूरे हे कुटूंबाला एक गुंठा ही शेतजमीन नाही. हे कुटूंब ज्या घरात राहत होते, ते घर म्हणजे बाहेरच्या खोलीत चटणी करायचा डंक व आतील एका खोलीत संपूर्ण कुटूंब. अशी हलाखीची परिस्थिती असताना ही कुटूंबाची आर्थिक प्रगती होण्यासाठी शिवम विसापुरे याची आई छाया विसापुरे या आशा सेविका म्हणून काम करायच्या. तसेच शाळेत पोषण आहार देखील तयार करत. वडिल दत्तात्रय विसापूरे यांनी तासवडे एम.आय.डी.सी मध्ये नोकरी केली. काही काळ त्यांची नोकरी ही गेली. त्यावेळी आईने संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेत संसाराचा रथ ओढला.प्रामाणिक प्रयत्न व जोडीला कष्ट असले तर दिवस बदलतात. हे डोक्यात ठेऊन या कुटूंबाने आर्थिक प्रगती केली. शिवम हुशार व जिद्दी होता. यामुळे विसापुरे दांपत्याने ठरवले की, काहीही झाले तरी शिवमला शासकीय अधिकारी बनवायचेच. लहान भाऊ अक्षयने वडिलांना व्यवसायात साथ देऊन मोठा भाऊ शिवमला यश मिळवण्यासाठी मदत केली. याच दरम्यान, शिवमचे लग्न केले. पत्नी पुजानेही शिवमला सहकार्य केले. पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात २५ व्या वर्षी शिवम नायब तहसीलदार बनला. तिसऱ्या प्रयत्नात २६ व्या वर्षी पोलीस उपअधीक्षक झाला.शिवमने प्राथमिक शिक्षण चरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल मध्ये घेतले. मँकेनिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाची पदविका कराडच्या शासकीय कॉलेज मधून घेतली. पुणे येथील कॉलेज मधून मँकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे.ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत चरेगाव येथील सर्वसामान्य कुटूंबातील शिवमने मिळवलेल्या यशाचा आनंद विसापुरे कुटूंबाला झालाच. पण आपल्या चरेगावचे नाव शिवमने रोशन केले. याचा आनंद चरेगाव ग्रामस्थांना ही झाला. शिवम गावात आल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले.वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली. कोणी त्याला घोड्यावर बसवले. कोणी ओपन जीप मध्ये बसवले. तर मित्रांनी खांद्यावर बसवून शिवमची गावातून मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. 

घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना ही आई,वडील यांनी कष्ट करून मला शिकवले. लहान भावाने वडिलांना व्यवसायात मदत केल्याने मला अडचण आली नाही. आई-वडिलांचे कष्ट मी विसरू शकत नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे हे मी ठरवले अन् जिद्दीने ते पूर्ण केले. - शिवम दत्तात्रय विसापुरे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMPSC examएमपीएससी परीक्षा