शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी अन् बनवडीचा ग्रामस्वच्छता अभियानात डंका

By नितीन काळेल | Updated: February 26, 2024 18:46 IST

सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखली

सातारा : सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखली असून आता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि कऱ्हाडमधील बनवडीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यस्तरावरील डंका कायम राहिला आहे. तर या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ मार्च रोजी होणार आहे.सातारा जिल्हा परिषदेने मागील २० वर्षांपासून शासनाच्या विविध योजना, उपक्रमांत दबदबा निर्माण केलेला आहे. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राममध्येही सातत्याने यश मिळवले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यस्तर तसेच दिल्लीतही गाैरव झाला आहे. आताही सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखत याहीवर्षी राज्यात पुरस्कार पटकावला आहे. तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९, २०१९-२० तसेच २०२०-२१ आणि २०२१-२२ (एकत्रित एक स्पर्धा) या वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय पुरस्कार प्राप्त ठरलेल्या ग्रामपंचायती व विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा ५ मार्च रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. तसेच दि.१ मार्च रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागात प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील बनवडी आणि मान्याचीवाडी ग्रामपंचायतींचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील कामाबद्दल गौरव होत आहे. हा ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकत्रित स्वच्छतेतील सातत्यपूर्ण कामगिरीचा परिपाक आहे. सर्वांचे जिल्हा परिषदेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबरच या गावांकडून जिल्ह्यातील इतर गावांनी प्रेरणा घेऊन यश मिळवावे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषद